Road work | कोळगाव-कोथूळ रस्त्याच्या कामाला पोलीस बंदोबस्तात सुरुवात

जीव मुठीत धरून प्रवास

0

Road work | श्रीगोंदा: महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील समन्वयाचा अभाव आणि ‘लालफितीच्या’ कारभारामुळे कोळगाव ते कोथूळ दरम्यानच्या साडेतीन किलोमीटर रस्त्याचे काम (Road work) मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. या रखडलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या कोथूळ ग्रामस्थांनी प्रशासनाला ‘रास्ता रोको’चा इशारा दिला होता. दुसरीकडे जमीन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, आता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हे काम पूर्ण करण्याचा पवित्रा घेत सोमवारी (ता.१६) काम करण्यास सुरुवात केली.

अवश्य वाचा- रंधा धबधबा येथे होणार काचेचा पूल

जीव मुठीत धरून प्रवास (Road work)

देऊळगाव-भानगाव-दोरजे-कोथूळ-कोळगाव या राज्यमार्गाचे काम मंजूर होऊन बरेच काम पूर्ण झाले आहे. मात्र, कोथूळ ते कोळगाव या साडेतीन किलोमीटरच्या टप्प्यात जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जमीन अधिग्रहित करूनही मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोबदला मिळाल्याशिवाय काम सुरू करू नये असा पवित्रा घेतला. प्रशासकीय अडकगुंत्यामुळे सर्वसामान्यांना मात्र जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या साडेतीन किलोमीटर “रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात वाढले आहेत. रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी आणि शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत आहे. येत्या आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास कोथूळ नागरिक रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here