
Emmanuel Macron : नगर : फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासोबत होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीसाठी आज मुंबई येथे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत (Acharya Devvrat) व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मॅक्रॉन तसेच त्यांच्या पत्नी ब्रिगिट यांचे स्वागत केले.

मोदी व मॅक्रॉन यांची महत्वपूर्ण बैठक
मंगळवारी (दि. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष मॅक्रॉन यांची महाराष्ट्र लोकभवन येथे महत्वपूर्ण बैठक होत आहे.
अवश्य वाचा : कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी याेग्य उपाययोजना कराव्यात – उपसभापती नीलम गोऱ्हे
गेटवे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात सहभागी होणार (Emmanuel Macron)
संध्याकाळी पंतप्रधान मोदी व मॅक्रॉन हे गेटवे ऑफ इंडिया येथे होत असलेल्या ‘इंडिया – फ्रांस यिअर ऑफ इनोव्हेशन अँड कल्चरल कमेमोरेशन’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मॅक्रॉन यांच्या मुंबई आगमन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल व वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.


