
Sunetra Pawar becomes National President of NCP : नगर : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड निवड (Sunetra Pawar becomes National President of NCP) करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी बैठकीमध्ये राष्ट्रीवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.
नक्की वाचा: अजित पवारांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांकडून निधनाच्या दिवशीच सह्यांचा सपाटा; मुख्यमंत्र्यांना दिली स्थगिती
26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक
प्रफुल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलं, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आता फक्त औपचारिकता बाकी असून, येत्या 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठक पार पडणार आहे, या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा होईल अशी माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : मालेगावमध्ये पुन्हा पेटला टिपू सुलतान वाद; पुन्हा फोटो लावणार असल्याचं उपमहापौरांचं वक्तव्य
सर्व आमदारांकडून हात वर समर्थन (Sunetra Pawar becomes National President of NCP)
आज देवगिरी बंगल्यावर आमदाराची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. प्रफुल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलं. आता येत्या 26 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक होणार आहे, या बैठकीत याबाबत घोषणा होणार आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, उपमुख्यमंत्रिपदासोबतच त्यांच्याकडे इतरही काही खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. विधिमंडळाचा गट नेता म्हणून देखील त्यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे.


