Pathardi News:वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक

0
Pathardi News:वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक
Pathardi News:वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक

Pathardi News: वीटभट्टीवर तब्बल ३० वर्षे काम करणाऱ्या (Parents working at a brick kiln) दाम्पत्याच्या मुलाने आपल्या जिद्दीच्या बळावर एमपीएससीच्या परीक्षेतून(MPSC Exams) मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीतील (Pathardi News) जवळवाडी इथल्या ज्ञानेश्वर जगन्नाथ गोल्हार (Dnyaneshwar Jagannath Golhar) याने नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेतून कृषी उपसंचालक पदाला गवसणी घातली. ज्ञानेश्वरच्या या यशाबद्दल गोल्हार येथील ग्रामस्थांनी सवाद्य मिरवणूक काढत त्याच कौतुक केलं आहे.

नक्की वाचा: सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार आता बंद;केस पेपरपासून शस्त्र क्रियेपर्यंत द्यावे लागणार ‘एवढे’पैसे

ज्ञानेश्वर यांचा संघर्ष नेमका कसा ? (Pathardi News)

ज्ञानेश्वर यांचे वडील जगन्नाथ व आई कांताबाई हे दोघे वीटभट्टीवर मागील ३० वर्षांपासून काम करतात. त्याला चार बहिणी, चार मुली व एका मुलाचा संसार चालवताना गोल्हार दाम्पत्याला तारेवरची कसरत करावी लागली. त्यामुळे मुलींना शिकवता आले नाही. मात्र, ज्ञानेश्वरला त्यांनी पोटाला चिमटा घेत शिक्षणाच्या प्रवाहापासून कधीही दूर ठेवलं नाही. ज्ञानेश्वर पहाटे पाच वाजता अभ्यासाला उठायचा. शाळेच्या सुटीच्या दिवशी ज्ञानेश्वर आई-वडिलांना मदत करायचा. त्याच्या बहिणी सुद्धा आई वडिलांसोबत वीटभट्टीवर काम करण्यासाठी जायच्या. त्यांना साडेतीन एकर जमीन होती. दिवसा वीटभट्टीवर काम करून ते शेतातही राबायचे. घरची आर्थिक परिस्थिती खडतर असल्याने त्यांना काम करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. वेळप्रसंगी त्यांना आठवडे बाजारही करता येत नसे.

अवश्य वाचा: महायुती सरकारचा यू टर्न! शासकीय रुग्णालयात यापुढेही मोफतच उपचार  

आई- वडिलांचा, बहि‍णींचा हा संघर्ष, ज्ञानेश्वर पाहत होता. त्यातूनच त्याने खूप अभ्यास केला. यातून स्पर्धा परीक्षेला सामोरे जात, ज्ञानेश्वरने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेत यश संपादन केले. ज्ञानेश्वर सनदी अधिकारी झाल्याचे समजताच जवळवाडी ग्रामस्थांनी खरवंडी कासार, तर जवळवाडी  येथून त्याची सवाद्य मिरवणूक काढत त्याचा सत्कार केला. या सत्काराने त्याचे कुटुंबीय भारावून गेले होते.

‘आई-वडिलांच्या कष्टाला पूर्णविराम देण्यासाठी अधिकारी व्हायचे ठरवले’  (Pathardi News)

ज्ञानेश्वर गोल्हार याने, या यशावर प्रतिक्रिया देताना म्हटला, कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचचं आहे, ही प्रेरणा आई-वडिलांकडून मिळाली. त्यांनी अत्यंत कष्ट करत मला शिकण्याची व मोठा अधिकारी होण्याची प्रेरणा दिली. वयाच्या तेराव्या वर्षी सुद्धा मी व माझ्या बहिणी आई-वडिलांसोबत मदत करण्यासाठी वीटभट्टीवर काम करण्यासाठी जात होतो. कोणत्याही परिस्थितीत मोठे यश संपादन करून आई-वडिलांच्या कष्टाला पूर्णविराम देण्यासाठी अधिकारी व्हायचे हे ठरवले होते. ते स्वप्न पूर्ण झाले. माझ्या यशात आई-वडील, बहीण आणि सर्व गुरुजनांचा मोठा वाटा आहे, अशी भावनात्मक प्रतिक्रिया त्याने दिली आहे.