Maliwada Bus Stand : माळीवाडा बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर

Maliwada Bus Stand : माळीवाडा बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर

0
Maliwada Bus Stand : माळीवाडा बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर
Maliwada Bus Stand : माळीवाडा बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर

Maliwada Bus Stand : नगर : अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानकासमोरील (Maliwada Bus Stand) उड्डाणपुलाखालील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरु झालेले आहे. त्यामुळे माळीवाडा बसस्थानक ता. २१ फेब्रुवारी २०२६ पासून तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात येत आहे. त्यामुळे स्वस्तिक चौक बस स्थानक (Swastik Chowk Bus Stand)तारकपूर बस स्थानक (Tarakpur Bus Station) येथून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

नक्की वाचा : शिर्डीत मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप समारंभ उत्साहात

एसटी प्रश्नाच्या वतीने सूचना

नाशिक, धुळे, संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर, सोलापूर, पंढरपूर व अकोला मार्गे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या तारकपूर बस स्थानक येथून बस सोडण्यात येणार आहेत. तसेच शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड, पारनेर, व तुळजापूर मार्गे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या स्वस्तिक बसस्थानक येथून सुटणार आहेत. ताराकपूर आगाराच्या ग्रामीण फेऱ्या स्वस्तिक बसस्थानक येथून मार्गस्थ होणार आहेत. अशी सूचना एसटी प्रश्नाच्या वतीने देण्यात आली आहे.

अवश्य वाचा : अजित पवारांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांकडून निधनाच्या दिवशीच सह्यांचा सपाटा; मुख्यमंत्र्यांना दिली स्थगिती

पर्यायी बसस्थानके (Maliwada Bus Stand)

तारकपूर बसस्थानक – नाशिक, धुळे, संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर, सोलापूर, पंढरपूर व अकोला मार्गे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या

स्वस्तिक बसस्थानक – शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड, पारनेर व तुळजापूर मार्गे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या तसेच तारपूर आगाराच्या ग्रामीण फेऱ्या