
Artificial Intelligence : नगर : अहिल्यानगर शहरात दिव्यदृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्थेतर्फे एआय (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून अंध बांधवांचे जीवन उजळविणासाठी एका विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत अहिल्यानगरच्या मार्केट यार्ड (Market Yard) येथील शेतकरी निवास येथे असलेल्या आठरे पाटील सभागृहात (Athre Patil Hall) होणार आहे.
नक्की वाचा : वीटभट्टी कामगाराच्या मुलाची यशाला गवसणी;एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक
अंध व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी विशेष प्रशिक्षण
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून अंध व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी अहिल्यानगरमध्ये विशेष प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. ए.आय. (AI) आता काळाची गरज आहे. दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी ए.आय. तंत्रज्ञानाचा जबाबदारीने व प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रशिक्षण देण्यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी केवळ पहिली नोंदणी करणाऱ्या १०० अंध दिव्यांग व्यक्तींनाच प्रवेश मिळेल. कार्यशाळेत सहभाग नोंदवू इच्छिणाऱ्यांनी गुगल फॉर्म लिंकवर जाऊन आपले त्वरित रजिस्ट्रेशन करावे.
हे वाचा : ’मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो’;हर्षवर्धन सपकाळ यांनी मागितली ‘त्या’ वक्तव्याची माफी
नावनोंदणी प्रक्रिया २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू (Artificial Intelligence)
नावनोंदणी https://forms.gle/un8AWYK244Kc8gvSA या लिंकवर करावी लागणार आहे. नावनोंदणी प्रक्रिया २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहिल. नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच कार्यशाळेत प्रवेश दिला जाणार आहे. कार्यशाळेत सहभागींसाठी चहा, नाश्ता आणि दुपारच्या भोजनाची मोफत व्यवस्था असेल. अधिक माहितीसाठी संपर्क : किरण खेतमाळस – 9766050531, कृष्णा तवले – 9850885946, सुनील बाचकर – 8888498992, निलेश शिंदे – 9420161923, सुभाष शिंदे – 9049833060


