Shivdurg Trekkers : नगर : महाराष्ट्र (Maharashtra) बारव मोहिन अंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रात महाशिवरात्रीला असंख्य पुरातन बारवांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील देऊळगाव गलांडे, खंडोबा मंदिर श्रीगोंदा, काशीबारव मांडवगण रोड, बेलवंडी कोठार, या ऐतिहासिक व पुरातन बारवांवर शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन, (Shivdurg Trekkers) जगदंब युवा प्रतिष्ठान, जय भवानी तरुण मित्र मंडळ बेलवंडी कोठार, समस्त ग्रामस्थ बेलवंडी कोठार, समस्त ग्रामस्थ देऊळगाव गलांडे, यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
दररोज नजरेसमोर असूनही नजरेआड गेलेला आणि आपल्या पूर्वजांनीं मोठ्या कष्टाने निर्माण केलेला वारसा म्हणजे बारव. बारव आपली संस्कृती, बारव आपला इतिहास आहे. बारव बांधायला आपले हात नसले तरीही बारव जपण्यास आपले हात नक्कीच असावेत म्हणून, ही वेगळ्या विचारांची तरूणाई बारव संवर्धनासाठी काम करीत आहे.
हे वाचा: जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीची प्रभाग रचना; निवडणुकीचा बिगूल लवकरच वाजणार
देऊळगावने जपली परंपरा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये ‘मनकी बात’ मध्ये देऊळगाव येथील बारवची दखल घेतल्यापासून दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जात आहे. देऊळगाव गलांडे येथे गावकरी व जगदंब युवा प्रतिष्ठान व शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील प्राचीन चालुक्यकालीन बारवेवर दीप प्रज्वलन व आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली. यावेळी तरूण, भाविक व महिलांची केदारेश्वराचे दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. अनेक महिलांनी आपल्या घरून पाच दिवे आणून इथे लावले. केदारेश्वर महादेवाच्या आरतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. संपुर्ण उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून आपल्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
नक्की पहा : मुलाने आईचा खून केल्यावर काय केले? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

लोकांची चळवळ (Shivdurg Trekkers)
महाराष्ट्र बारव मोहिम रोहन काळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ही लोक चळवळ आहे. आपल्या वारसा स्थळांचा इतिहास व महत्व पटवून दिले की, नागरीक बारव जपण्याास पुढे येतात. पुढील पिढीसाठी या बारवा जपायच्या आहेत. अशी भावना सर्वांची भावना आहे. हा वारसा जपण्याचे पवित्र कार्य हाती घेतल्याबद्दल देऊळगाव गलांडे, बेलवंडी कोठार व श्रीगोंदा शहरातील तरुणांचे अभिनंदन!
– राजेश इंगळे, बारव समन्वयक, अहिल्यानगर
या कार्यक्रमासाठी शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे, मारूती वागस्कर, दिगंबर भुजबळ, अमोल बडे, सचिन भोसले, ॲड. गोरख कडुस, ईश्वर कोठारे, अक्षय ओहळ, संगीता इंगळे, डॉ. स्मिता तरटे, देऊळगावचे सरपंच महेश गायकवाड, राहुल नवले, किरण नवले, शंकर दांगडे, वैभव दांगडे, आनंद झराड, शिवदुर्ग शिलेदार टीम, जगदंब युवा प्रतिष्ठान देऊळगाव गलांडे, जय भवानी तरुण मित्र मंडळ बेलवंडी कोठार यांनी मोलाची कामगिरी बजावली.



