Pune : बुधवार पेठेत सर्च ऑपरेशन; ११ बांगलादेशी महिला आढळल्या

0
Pune : बुधवार पेठेत सर्च ऑपरेशन; ११ बांगलादेशी महिला आढळल्या
Pune : बुधवार पेठेत सर्च ऑपरेशन; ११ बांगलादेशी महिला आढळल्या

Pune : नगर : पुणे (Pune) शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी छापेमारी (Raid) करत कुंटणखान्यांतील महिलांची पडताळणी केली. यावेळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या ११ महिला या बांगलादेशी असल्याचे त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीतून समोर आले. यानंतर पोलिसांनी संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. पोलिसांनी राबवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये पुन्हा एकदा ११ बांगलादेशी महिला आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : उद्योजकाकडून खंडणी मागणारा जेरबंद; MIDC पोलिसांची कारवाई

पोलिस आयुक्तांकडून आढावा

पुण्यातील बुधवार पेठेत झालेल्या कारवाईचा पोलिस आयुक्तांकडून आढावा घेण्यात आला आहे. त्यासाठी स्वतः पोलिस आयुक्त फरासखाना पोलिस ठाण्यात पोहचले. पुण्यातील बुधवार पेठेतून ११ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडकी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

नक्की पहा : संगमनेर शहरातील सोसायटीमध्ये बिबट्याच्या शिरकाव

सर्व इमारतींची तपासणी करून कारवाई (Pune)

या घटनेप्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, मी सुरुवातीला म्हणालो होतो बुधवार पेठेत बेकायदेशीर हालचाली आहेत, त्यावर कारवाई केली जाणार सांगितले होते. त्यानुसार आम्ही काल रात्री पुन्हा कारवाई केली. काल रात्री कारवाई करण्यात आली, यात ११ बांगलादेशी महिला सापडल्या. एकूण २२ महिलांना आम्ही ताब्यात घेतलं आहे. बुधवार पेठ परिसरात अश्या हालचालींना मदत करणाऱ्या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. जे जे बेकायदेशीर आहे, सर्व इमारतींची तपासणी करून कारवाई केली जाईल. पोलीस दलाची सुरू असलेली कायदेशीर कारवाई गरज पडल्यास आणखी वाढवू. बुधवार पेठेत महिला आणणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाणार आहे. पिटा कायद्यांतर्गत करवाई सुरु आहे. जी कारवाई सुरू आहे, ती नियमांच्या अधीन राहून सुरू आहे, अशी माहिती देखील पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिली आहे.