Digital board | अकोले: तालुक्यातील मा. मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथील दहावीच्या (२०२५-२६) विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा प्रदान व निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेला डिजिटल फळ्याची (Digital board) सप्रेम भेट देत कृतज्ञतेची अनोखी परंपरा जपली, आदिवासी भागातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी दाखविलेली ही सामाजिक जाणीव सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
अवश्य वाचा- काष्टी येथे भीषण अपघात; दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
मान्यवरांच्या हस्ते डिजिटल फळ्याचे लोकार्पण (Digital board)
शाळेचे आपण काही तरी देणे लागते, या उदात्त भावनेतून विद्यार्थ्यांनी स्वनिधी जमा करून शाळेसाठी डिजिटल फळा खरेदी केला. मान्यवरांच्या हस्ते डिजिटल फळ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेने दिलेले संस्कार, ज्ञानदान व शिक्षकांचे मार्गदर्शन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माजी उपसरपंच गोकळ कानकाटे यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, आर्थिकदृष्टया साधनसंपन्न नसतानाही विद्यार्थ्यांनी दाखवलेली कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी आहे. हा डिजिटल फळा आगामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचा ठरेल. प्राचार्य राजेंद्र खाडे, रामनाथ भालचिम, राम पवार, शिक्षक वर्ग, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन शेलार यांनी केले.



