Nevasa : कुकाण्यातील उपोषणकर्त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवले

0
Nevasa : कुकाण्यातील उपोषणकर्त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवले
Nevasa : कुकाण्यातील उपोषणकर्त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवले

Nevasa : नेवासा:
बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या दहाव्या दिवशी उपोषणकर्त्यांना अशक्तणा व चक्कर येत असल्याने त्यांना वैद्यकीय तपासणी करिता अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हे वाचा : संगमनेरमध्ये भरवस्तीत बिबट्याच्या पिल्लाची थेट घरात घुसखोरी

ग्रामपंचायत समोर उपोषण

बेलापूर- परळी रेल्वे मार्गासाठी बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीच्यावतीने रितेश विजयकुमार भंडारी, रज्जाक निजामशा इनामदार व सुरेश वसंतराव नरवणे यांनी सोमवारपासून (ता. ९) पासून कुकाणा येथे ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी (ता. १७) हा उपोषणा ९वा दिवस होता.

उपोषण सुरुच राहणार

“आमच्या प्रकृतीमध्ये अश्वस्थपणा जाणवल्याने व प्रकृति ढासळल्याने आज आम्हाला जिल्हा रुग्णालयात हलवले असले तरी आम्हाला मंजुरीपत्र मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरुच राहणार आणि आम्ही रुग्णालयात असलो तरी उपोषण स्थळी चक्री उपोषण सुरुच राहणार आहे.”
– रितेश भंडारी (उपोषणकर्ते)

वैद्यकीय पथकाकडून तपासणी (Nevasa)

उपोषणकर्त्यांनी त्यांना अशक्तणा व चक्कर येत असल्याचे वैद्यकीय विभागाला कळविल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपक डिंबर, कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे व त्यांच्या पथकाने उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. काल (ता. १८) उपोषणाचा १०वा दिवस असल्याने खबरदारी म्हणून पुढील वैद्यकीय तपासण्यासाठी उपोषणकर्त्यांना अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती डॉ.डिंबर यांनी दिली आहे.

हेही पहा: संगमनेर शहरात गांजा पकडला; दोघे जेरबंद