Police : नगर : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील (District Police Force) ३३ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदारपदी (Police Constable) पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी याबाबतचे आदेश काढले. पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अवश्य वाचा : उद्योजकाकडून खंडणी मागणारा जेरबंद; MIDC पोलिसांची कारवाई
शासन निर्णयान्वये अटी व शर्तीची पूर्तता
जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ३३ पोलीस नाईक हे शासन निर्णयान्वये अटी व शर्तीची पूर्तता करीत असल्याने त्यांना पोलीस नाईक या पदावरून पोलीस हवालदार या पदावर सध्याचे नेमणुकीचे ठिकाणी पदोन्नती देण्यात आली.
नक्की वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी केले खळबळजनक दावे
पदोन्नती मिळालेले पोलीस अंमलदार (कंसात नियुक्तीचे ठिकाण) (Police)
सुनील निकम (राहुरी), सागर सदाफळ (कोपरगाव), सविता उंदरे (श्रीरामपूर शहर), सुरेखा वलवे (बेलवंडी), शाहीद शेख (भिंगार कॅम्प), अविनाश ढेरे (अहिल्यानगर तालुका), दत्तु चौधरी (घारगाव), गोकुळ इंगवले (श्रीगोंदा), तन्वीर शेख (तोफखाना), अविनाश वाकचौरे (कोतवाली), अशोक पवार (शिर्डी), संदीप गायकवाड (आर्थिक गुन्हे शाखा), भास्कर गायकवाड (मिरजगाव), अनिता खताळ (अकोले), मिराबाई बिबवे (संगमनेर शहर),
राम लहामगे (अकोले),जावेद शेख (शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर), अल्ताफ शेख (पाथर्डी), सोमनाथ झांबरे (एलसीबी), किशोर औताडे (श्रीरामपूर शहर), काकासाहेब मोरे (श्रीरामपूर तालुका), गणेश ठोंबरे (मिरजगाव), संदीप दरंदले (श्रीरामपूर शहर), प्रवीण बागुल (राहुरी), शहनावाज शेख (पोलीस मुख्यालय), भागवत शिंदे (श्रीरामपूर शहर), संतोष साबळे (कर्जत), किरण पवार (नेवासा), बाळासाहेब नागरगोजे (सायबर), मैनाबाई माळी (महिला तक्रार निवारण शाखा), स्वाती ढवळे (नागरी हक्क संरक्षण), रोहिणी वाडेकर (राजुर), सुजाता थोरात (संगमनेर शहर) यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : राज्यसभेसाठी भाजप कुणाला देणार संधी? ‘या’ नावाची जोरदार चर्चा



