
India AI Impact Summit 2026 : नगर : यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात प्रगती करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबद्दल देखील भाष्य केले. नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये (India AI Impact Summit 2026) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जगभरातील एआय कंपन्यांच्या सीईओंना (CEO) संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (AI) भारताचे ‘MANAV (मानव)’ हे व्हिजन जगासमोर मांडले.
अवश्य वाचा : उद्योजकाकडून खंडणी मागणारा जेरबंद; MIDC पोलिसांची कारवाई
भारताच्या वाढत्या महत्वाकांक्षेला अधोरेखित करणारी ही परिषद
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, 19 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ चं उद्घाटन करणार आहेत. बुधवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ही जागतिक दर्जाची परिषद कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) भविष्यकाळ आणि विविध क्षेत्रांवर त्याच्या परिवर्तनीय प्रभावावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत विविध देशाचे राष्ट्रप्रमुख, मंत्री, उद्योग, शिक्षणतज्ज्ञ आणि तंत्रज्ञान प्रेमी एकत्र आले आहे. भारताच्या वाढत्या महत्वाकांक्षेला अधोरेखित करणारी ही परिषद नैतिक, समावेशक आणि शाश्वत एआय विकासासाठी जागतिक संवाद घडवण्याचा प्रयत्न करतेय.

हे देखील वाचा : राज्यसभेसाठी भाजप कुणाला देणार संधी? ‘या’ नावाची जोरदार चर्चा
गालगोटिया युनिव्हर्सिटीला हाकलले (India AI Impact Summit 2026)
सोशल मीडियावर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर नेहा सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्या एका रोबोटिक डॉगला ओरियन असे संबोधून, तो युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसने तयार केल्याचा दावा करताना दिसल्या. मात्र, टेक तज्ज्ञांनी तातडीने हा दावा खोडून काढला. हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या यूनिट्री कंपनीचा Go2 मॉडेल असून तो बाजारात 2 ते 3 लाख रुपयांना सहज उपलब्ध आहे. रोबोटिक कुत्र्याच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण झाल्यानंतर गलगोटियास विद्यापीठाला एआय समिट एक्स्पो रिकामा करण्यास सांगण्यात आले.
नक्की वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी केले खळबळजनक दावे


