Marijuana : मिरजगावात गांजासह दोघे जेरबंद; २५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Marijuana : मिरजगावात गांजासह दोघे जेरबंद; २५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
Marijuana : मिरजगावात गांजासह दोघे जेरबंद; २५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Marijuana : मिरजगावात गांजासह दोघे जेरबंद; २५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Marijuana : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाणे (Mirajgaon Police Station) हद्दीत गांजाची (Marijuana) वाहतूक करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १३२ किलो गांजा असा एकूण २५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : उद्योजकाकडून खंडणी मागणारा जेरबंद; MIDC पोलिसांची कारवाई

यांच्या विरोधात गुन्हा दाखल

याबाबत गणेश अंकुश कराड (वय ३२), सुखदेव शिवनाथ कदम (वय -३०, दोघे रा. आगसखांड, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर), यांच्या विरोधात मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी केले खळबळजनक दावे

सापळा रचून घेतले ताब्यात (Marijuana)

अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याव्यक्ती विरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना दिले. त्यानुसार पथकाने गुप्त बातमीदार नुसार मिळालेल्या माहितीनुसार गांजा विक्रीकरीता कर्जत येथून पाथर्डी कडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिरजगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने मिरजगाव ते कर्जत जाणारे रस्त्यावरील ब्रिजखाली महात्मा फुले चौक येथे सापळा रचून गणेश कराड, सुखदेव कदम यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार गोण्या गांजा १८ लाख १८ हजारांच्या १३२ किलो गांजा असा एकूण २५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

हे देखील वाचा : राज्यसभेसाठी भाजप कुणाला देणार संधी? ‘या’ नावाची जोरदार चर्चा

याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भिमराज खर्से, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली. याबाबत भाऊसाहेब राजू काळे यांनी फिर्याद दिली आहे.