Murder : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथे दोन गटात झालेल्या वादातून मारहाणीत एकाचा खून (Murder) झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेतील दोन संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. ताब्यात घेतलेला संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार (Hardened criminal) असून त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. महेश किरास चव्हाण (वय-२५,रा. आढळगाव ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), शैला महेश चव्हाण (वय-२७), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा : उद्योजकाकडून खंडणी मागणारा जेरबंद; MIDC पोलिसांची कारवाई
याबाबत माहिती अशी की,
फिर्यादी यांच्या घरासमोर गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मरहान केली होती. या मारहाणीत भाऊसाहेब नामदेव राजपुत हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपच्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास करीत असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील संशयित आरोपी महेश किरास चव्हाण हा जामखेड रस्त्यावरील हत्तीबारव परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
हे देखील वाचा : राज्यसभेसाठी भाजप कुणाला देणार संधी? ‘या’ नावाची जोरदार चर्चा
यांच्या पथकाने केली कारवाई (Murder)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, समीर अभंग, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, अमृत आढाव, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, सोनल भागवत, चालक भगवान धुळे यांच्या पथकाने केली.



