Crime : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद

Crime : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद

0
Crime : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद
Crime : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद

Crime : पाथर्डी : पाथर्डी (Pathardi) शहरातील कसबापेठ परिसरात बुधवारी (ता. १८) मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. पाथर्डी पोलिसांनी (Police) अवघ्या तीन तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत श्रीहरी भास्कर बोरुडे (वय ३५, रा. कसबापेठ, पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : “शिवछत्रपतींचे विचार हीच प्रेरणा”: विकास पालवे

पुतळ्याला आघात झाल्याचे स्पष्ट

फिर्यादीत म्हटले आहे की, रात्रीच्या सुमारास कुटुंबासह घरी असताना बाहेरून दगड फेकल्याचा आवाज आला. बाहेर येऊन पाहिले असता विनोद श्रीधर कोकाटे (रा. कोकाटे वस्ती, खेर्डा रोड, पाथर्डी) हा दारूच्या नशेत घराशेजारा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर सिमेंट ब्लॉक फेकताना दिसला. आवाज दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळी पाहणी केली असता पुतळ्याला आघात झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

अवश्य वाचा : श्रीगोंद्यातील शिक्षकांच्या वाट्याला ‘वेठबिगारी’;  शिक्षण विभागाचा छळ

उसाच्या शेतात लपून बसल्याचे निदर्शनास (Crime)

 या प्रकारामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी तत्काळ एकत्र येत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली व पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव तसेच गुप्तवार्ता विभागाचे नागेश वाघ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून आरोपीचा माग काढला. आरोपी कोकाटे हा त्याच्या घराजवळील उसाच्या शेतात लपून बसल्याचे निदर्शनास आले. मध्यरात्रीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

हे देखील वाचा : राहाता तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

कठोर कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. संबंधित आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे पुतळ्यावर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. इतर धार्मिक स्थळांबाबतही त्याने असे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.