Bhigwan Case : नगर : गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत असणारा भिगवण अपहरण प्रकरणात (Bhigwan Kidnapping Case) नवीन ट्विस्ट आलं असून अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री बारामती शहर पोलीस (Police) ठाण्यामध्ये हजर झाली आहे. यानंतर तिने या प्रकरणात जबाब (Statement) नोंदवला असल्याची देखील माहिती समोर येत आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये आई आणि भावासोबत लग्राची शॉपिंग करण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. तरुणीच्या आईला आणि भावाला मारहाण करुन डोळ्यात मिरचीपूड टाकून तरुणीचा अपहरण करण्यात आल्याची फिर्याद पोलिसांना देण्यात आली होती.
हे वाचा : राहुल गांधींसह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी; एकजण राजस्थान पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगर कनेक्शन
घटनेच्या दिवसापासून आतापर्यंत काय काय घडलेलं याबाबतची माहिती पोलिसांना तरुणीने दिली आहे. मंगळवारी मुलगी प्रियकरासोबत श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करुन महाबळेश्वरला गेली. यानंतर मुलगी तिच्या प्रियकरासोबत काल मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली असून मी माझ्या मर्जीने गेले असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. तर दुसरीकडे आरोपींनी मुलीच्या आई आणि भावावर कुठल्याही प्रकारची चटणी टाकली नसल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये समोर आला असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस काय करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
नक्की पहा : सोन्या चांदीचे भाव वाढतील कि कमी होतील? काय म्हणतात एक्सपर्टस चला जाणून घेऊयात…
मुलगी बारामती शहर पोलीस ठाण्यात (Bhigwan Case)
तर दुसऱ्या एका रिपोर्टनुसार, मुलीच्या प्रियकराला पोलिसांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका प्रायव्हेट गाडीतून कुठे तरी घेऊन गेले तर मुलगी आता बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये आहेत. मात्र पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला कुठे घेऊन गेले आहेत? याबाबत कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही.



