10th Exam : श्रीगोंद्यात दहावीची परीक्षा सुरू; संवेदनशील केंद्रावर प्रशासनाची करडी नजर…

10th Exam : श्रीगोंद्यात दहावीची परीक्षा सुरू; संवेदनशील केंद्रावर प्रशासनाची करडी नजर...

0
10th Exam : श्रीगोंद्यात दहावीची परीक्षा सुरू; संवेदनशील केंद्रावर प्रशासनाची करडी नजर...
10th Exam : श्रीगोंद्यात दहावीची परीक्षा सुरू; संवेदनशील केंद्रावर प्रशासनाची करडी नजर...

10th Exam : श्रीगोंदा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (State Board of Secondary and Higher Secondary Education) वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा (10th Exam) श्रीगणेशा आजपासून झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यात प्रशासनाने ‘कॉपीमुक्त’ अभियानांतर्गत कडक पावले उचलली असून, पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला विद्यार्थ्यांनी (Student) उत्साहात हजेरी लावली. तालुक्यात एकूण ४,०८९ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहेत.

अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद

संपूर्ण तालुक्यात १३ परीक्षा केंद्रे कार्यान्वित

तालुक्यातील शैक्षणिक वातावरण सध्या बोर्डाच्या परीक्षेमुळे ढवळून निघाले आहे. परीक्षेच्या सुयोग्य नियोजनासाठी संपूर्ण तालुक्यात १३ परीक्षा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या होत्या.

नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…

‘संवेदनशील’ परीक्षा केंद्रावर करडी नजर (10th Exam)

यावर्षीच्या परीक्षेत विसापूर हे केंद्र ‘संवेदनशील’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या केंद्रावर कोणताही गैरप्रकार घडू नये किंवा बाहेरील हस्तक्षेपाने परीक्षेची शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाने तेथे विशेष सुरक्षा आणि ‘करडी नजर’ ठेवली आहे. विसापूर केंद्राच्या हालचालींवर तालुकास्तरीय भरारी पथकांचे विशेष लक्ष असणार आहे.

कॉपीबहाद्दरांना लगाम घालण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. तालुक्यात विविध स्तरांवरील भरारी पथके (Flying Squads) तैनात करण्यात आली आहेत. ही पथके अचानक केंद्रांना भेटी देऊन तपासणी करणार आहेत. “विद्यार्थ्यांनी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता नैसर्गिक वातावरणात परीक्षा द्यावी,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एकूण विद्यार्थी: ४,०८९

एकूण केंद्रे: १३

संवेदनशील केंद्र: विसापूर