SSC Exam : राहाता : रयत शिक्षण संस्थेचे शारदा संकुलात दहावी बोर्ड परीक्षा (SSC Exam) आजपासून (ता. २०) सुरू होत असून एकूण ९४२ विद्यार्थी (Students) परीक्षा देत आहेत. सर्व विद्यार्थ्यांवर CCTV च्या माध्यमातून करडी नजर (Watch) ठेवण्यात येणार आहे.
हे वाचा : भिगवण प्रकरणातील तरुणी अचानक पोलीस ठाण्यात हजर; अहिल्यानगर कनेक्शन समोर
गुलाब पुष्प देऊन स्वागत
पहिल्या पेपरच्या अनुषंगाने संकुलातर्फे विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच कसून तपासणी करूनच परीक्षेसाठी प्रवेश देण्यात आला आहे. सर्व ब्लॉक तसेच संकुलाचा पूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आहे. लाईव्ह सीसीटीव्ही फुटेज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची कॉपी होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्यात आल्याचे केंद्र संचालिका हेमलता गुंजाळ यांनी सांगितले.
हे पहा : तुमच्या खिशातले पैसे परत मिळणार? सिस्पेच्या जप्त केलेल्या पैशांचे काय होणार?
यांनी केले नियोजन (SSC Exam)
या परीक्षेचे नियोजन उपकेंद्र संचालक प्रतीक बेल्हेकर, प्रीती सुधाजी शैक्षणिक संकुलाचे केंद्र संचालक सचिन गीते, प्राचार्य अनिल बनसोडे, प्रा. शरद गमे, प्रा. रमेश आहेर, प्रा. बाळासाहेब दिघे, प्रा. प्रसाद खोत, संजय खंदारे, धर्मदाय वसावे, प्रणव चंदने, राजकुमार साळवे, सुरज राठोड, संजय जाधव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.



