
Murder : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील वांबोरी व डोंगरगण हद्दीत असलेल्या वांबोरी घाट परिसरात खताच्या गोणीत बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या पुरुषाच्या मृतदेहाची (Dead Body) अखेर ओळख पटली असून, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा (Murder) उलगडा केला आहे. सख्खा भाऊ बनला पक्का वैरी या म्हणीप्रमाणेच भावानेच भावाचा काटा काढल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) संशयित आरोपी भाऊ व वडील यांना ताब्यात घेतले आहे. शिवाजी शंकर कवाणे (वय – ५५), योगेश शिवाजी कवाणे (वय- ३०, दोन्ही रा. टाकळीमियॉ ता. राहुरी जि. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद
गोणीत बांधलेला आढळून आला हाेता मृतदेह
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या वांबोरी घाटात मंगळवारी (ता. १७) सकाळी सुमारे १० वाजता डोंगरगण येथील काही नागरिक सरपण गोळा करण्यासाठी घाट परिसरात गेले असता पहिल्या वळणाजवळील खोल दरीतून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी पाहणी केली असता खताच्या गोणीत बांधलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला. संबंधित इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घाटातील दरीत फेकण्यात आला होता.

नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…
गुन्हा लहाण भाऊ व वडिलांनी केल्याचे तपासात समोर (Murder)
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनीही पाहणी केली असून फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मृतदेहाच्या हातावर ‘के.के.’ व ‘सोनल’ असे गोंदलेले असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यावरून तपास सुरू केला तसेच सोशल मीडियावरून आवाहन केले. तो राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाणे यांचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तपासाचे चक्र फिरवत तसेच तांत्रिक विश्लेषणानुसार हा गुन्हा मयताचा लहाण भाऊ व वडिलांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पथकाने तत्काळ संशयीताला ताब्यात घेतले असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. आई व बापाला दारू पिऊनच मारहाण करत असल्याने त्याचा खून केला असल्याचे पोलीस तापासात समोर आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विष्णू भागवत, दीपक घाटकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक महादेव भांड यांच्या पथकाने केली.


