Minor Girl Kidnapped : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि अत्याचाराची (Minor Girl Kidnapped) धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी (Police) तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक (Accused Arrested) केली आहे. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी गावबंदची हाक दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद
मुलीचे अपहरण झाल्याची शक्यता
राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील आदिवासी कुटुंबातील 15 वर्षीय मुलगी 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. मुलीचे अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संबंधित मुलीच्या मोबाईलचे लोकेशन आणि तांत्रिक माहितीच्या शोधमोहीम राबवण्यात आली. तपासादरम्यान मुलीला नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला परिसरातील जंगलात नेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तेथून मुलीची सुटका केली.
नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…
तिघांविरोधात गुन्हा दाखल (Minor Girl Kidnapped)
या प्रकरणातील मुख्य आरोपी मुक्तर हैदर पठाण याच्यासह त्याला सहकार्य करणाऱ्या आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीला पाच दिवस जंगलात ठेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप असून, तिघांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून गावबंदची हाक देण्यात आली आहे. काही सामाजिक आणि राजकीय संघटनांनीही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे राहुरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



