Attempt to Kill : शेतातील बांधावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न; एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल

Attempt to Kill : शेतातील बांधावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न; एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल

0
Attempt to Kill : शेतातील बांधावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न; एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल
Attempt to Kill : शेतातील बांधावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न; एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल

Attempt to Kill : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक परिसरात शेताच्या सामाईक बांधावरून दोन गटात तुफान हाणामारी (Clash between two groups) झाली, लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करत जीवघेणा हल्ला (Attempt to Kill) करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) एका गटाच्या चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा तर दुसऱ्या गटाच्या चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद

लोखंडी पाईपने डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न

शिंगवे नाईक येथील इस्लामपूर शिवारातील शेत गट नंबर १६९ च्या सामाईक बांधावर ही घटना घडली. फिर्यादी चंद्रकांत दत्तात्रय काळे हे आपल्या शेतात असताना आरोपींनी जुन्या वादातून त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना गाठले. यावेळी झालेल्या वादात आरोपी गोरख भाऊसाहेब जाधव याने लोखंडी पाईपने ऋषिकेश काळे यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…

चौघांच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल (Attempt to Kill)

याच वेळी गौरव गोरक्षनाथ जाधव याने फिर्यादीच्या वडिलांना खाली पाडले, तर बाळासाहेब भाऊसाहेब जाधव याने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर आणि पायावर गंभीर मारहाण केली. आरोपी धनंजय सुभाष जाधव यानेही लाकडी दांडक्याने ऋषिकेश काळे यांना बेदम मारहाण केली. सर्व आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला लाथाबुक्क्‌यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत चंद्रकांत काळे यांच्या फिर्यादी वरून गोरख भाऊसाहेब जाधव, बाळासाहेब भाऊसाहेब जाधव, गौरव गोरक्षनाथ जाधव, धनंजय सुभाष जाधव (सर्व रा. शिंगवेनाईक, ता. नगर) या चौघांच्या विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लोखंडी पाईप, रॉड आणि लाकडी दांडके जप्त केले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी करत आहेत.

दुसऱ्या गटाचे गोरख भाऊसाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ बाळासाहेब जाधव यांनी आरोपींना गट नंबर १७०/१ च्या सामाईक बांधावर दगड टाकू नका, असे सांगितले. याचा राग आल्याने दत्तात्रय मुरलीधर काळे, चंद्रकांत दत्तात्रय काळे, भरत शिवाजी काळे आणि ऋषी अंकुश काळे (सर्व रा. शिंगवे नाईक) यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

रागाच्या भरात आरोपींनी लाकडी दांडके आणि दगडांनी गोरख जाधव यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांचे चुलत भाऊ धनंजय जाधव आणि मुलगा सचिन जाधव यांनाही शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी दत्तात्रय मुरलीधर काळे, चंद्रकांत उर्फ बाबा दत्तात्रय काळे, भरत शिवाजी काळे आणि ऋषी अंकुश काळे या चौघांच्या विरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मिसाळ करत आहेत.