Radhakrishna Vikhe Patil : भविष्यात वाडियापार्क क्रीडा संकुल हे राज्यातील सर्वात उत्कृष्ट व परिपूर्ण स्टेडियम ठरेल : पालकमंत्री विखे

Radhakrishna Vikhe Patil : भविष्यात वाडियापार्क क्रीडा संकुल हे राज्यातील सर्वात उत्कृष्ट व परिपूर्ण स्टेडियम ठरेल : पालकमंत्री विखे

0
Radhakrishna Vikhe Patil : भविष्यात वाडियापार्क क्रीडा संकुल हे राज्यातील सर्वात उत्कृष्ट व परिपूर्ण स्टेडियम ठरेल : पालकमंत्री विखे
Radhakrishna Vikhe Patil : भविष्यात वाडियापार्क क्रीडा संकुल हे राज्यातील सर्वात उत्कृष्ट व परिपूर्ण स्टेडियम ठरेल : पालकमंत्री विखे

Radhakrishna Vikhe Patil : नगर : आपल्या नगरच्या क्रीडा क्षेत्राच्य दृष्टीने अभिमान वाटावा असे काम आज होत आहे. खेळाडूंना चांगल्या अद्यावत नव्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी एक दमदार पाऊल उचलले आहे. वाडियापार्कच्या (Wadia Park Sports Complex) नूतनीकरणामुळे आपल्या जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना आता मिळणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारानं यासठी ५३ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यातील पहिल्या टप्प्यातील १५ कोटी रुपयांच्या क्रीडा सुविधांच्या कामाचे भूमिपूजन आज होत आहे. याचा आनंद होत आहे. ज्यावेळेस संपूर्ण ५३ कोटी रुपयाचं काम पूर्ण होईल, त्यावेळी वाडियापार्क क्रीडा संकुल हे राज्यातील सर्वात उत्कृष्ट व परिपूर्ण असे स्टेडियम ठरेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला.

खेळाडू तसेच नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित

अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राच्या वैभवात भर टाकण्यासाठी शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल च्या पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार डॉ.सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदींसह शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू, सर्व नगरसेवक, क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू तसेच नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद

पालकमंत्री विखे म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)

यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केवळ खेलो इंडिया साठी ९०० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात ऑलिंपिक खेळाडू घडणार आहेत. नवे खेळाडू हे भारताची गुंतवणूक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी २०० ते ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव दिला आहे. विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातूनही खेळाडूंसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देऊ. जिल्हा क्रीडा कार्यालयाने गुणवंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू यांच्या अनुभवाचा फायदा घ्या त्यांच्यामार्फत प्रशिक्षण सुरू करा व चांगली योजना सुरू करण्यासाठी मला प्रस्ताव द्या त्यास नक्कीच परवानगी देऊ. क्रीडा क्षेत्रात नगर पहिला नंबर वर येण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत.

नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…

आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Radhakrishna Vikhe Patil)

नगरचे क्रीडा प्रशिक्षक उत्कृष्ट काम करून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत आहेत. त्यांच्या सततच्या पाठपुरव्यामुळेच हे काम शक्य झाले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पालकमंत्री पदाची धुरा हातात घेतल्यानंतर वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या विकासास त्यांनी सुरुवात केली आहे. विकसित आराखड्याला त्वरित मंजुरी मिळण्यासाठी सहकार्य केले. नगरच्या खेळाडूंना सिंथेटिक ट्रॅक नव्हता यासाठी ते पुण्यात जाऊन सराव करत.

मात्र, आता हा ट्रॅक नगर मध्येच होणार असल्याने खेळाडूंना चांगल्या सुविधा प्राप्त होतील. क्रिकेटसाठीही नगर मध्ये चांगले वातावरण असून क्रिकेटसाठी आत्याधुनिक मैदान, टर्फ विकेट तसेच सर्व सोयीसुविधा प्रत्यक्षात व्हाव्यात यासाठी निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाला नाव्याने आता केडगाव मध्ये सात एकर जागा प्राप्त झाली आहे. तेथेही लवकरच अद्यावत स्टेडियमसाठी मंजुरी मिळवून तेथे आयपीएल वनडे सारख्या क्रिकेट मॅचेस होतील असे भव्य स्टेडियम तिथे उभारू. माजी खासदार सुजय विखे यांनी नगर शहरावर कृपादृष्टी ठेवावी व लोणी मध्ये स्टेडियम न करता शहरातील केडगाव येथेच स्टेडियम उभारण्यासाठी सहकार्य करावे. वाडिया पार्क क्रीडा संकुलच्या प्रत्यक्ष विकास कामास सुरुवात होण्यासाठी पहिल्यांदाच भूमिपूजन होत आहे. त्यामुळे हा दिवस सर्व खेळाडूंसाठी सुवर्णाक्षरांनी लिहिणारा दिवस ठरेल.


यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते निर्मलचंद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा धावता आढावा घेतला. या कार्यक्रमास उपस्थितीत असलेले शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनीषा पुंडे, विलास दवणे, दिलीप घोडके, सुरेखा शिरसाठ, सुनील जाधव व केतकी बकोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी विविध खेळांचे क्रीडा प्रशिक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे बहुतांशी नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले, क्रीडाधिकारी भाऊराव वीर यांनी आभार मानले.