
Shani Shingnapur : नगर : शनिशिंगणापूर गावात, मंदिर (Temple) तसेच गावाच्या बाहेरील सार्वजनिक रस्ते, चौक, बसस्थानक, प्रवेशद्वार किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी (Public Place) होत असलेला अडथळा किंवा उपद्रव होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच शिंगणापूर गावात व मंदिर परिसरात सार्वजनिक शांतता, सुरक्षितता व सोयीसाठी उपविभागीय दंडाधिकारी (Sub-Divisional Magistrate) सुधीर पाटील यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ चे कलम १५२ (१) (a) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा : अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा; नोकरीचे आमिष दाखवत लॉजवर नेऊन अत्याचार
तात्काळ प्रतिबंध
शिंगणापूर गावाच्या बाहेरील सार्वजनिक रस्ते, चौक, बसथांबे, प्रवेश मार्ग किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी उभे राहून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना थांबवणे, दिशाभूल करणे अथवा मध्यस्थी करणे या कृत्यास तात्काळ प्रतिबंध करण्यात आला आहे.
नक्की पहा : बिबट्याचा श्वानावर हल्ला; इसळक येथील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा (Shani Shingnapur)
कोणत्याही व्यक्तीने देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवू नये व भोजन, निवास किंवा दर्शनाच्या नावाखाली अनधिकृत कृत्य करु नये. असे कृत्य करणाऱ्या संबंधित व्यक्तींनी तात्काळ अशा सार्वजनिक ठिकाणावरुन हटावे व भविष्यात अशा स्वरुपाची कृत्ये करु नयेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आदेशान्वये देण्यात आला आहे.


