Pathardi Police Station : कॉपी देण्यास विरोध केल्यामुळे होमगार्डला मारहाण; पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Pathardi Police Station : कॉपी देण्यास विरोध केल्यामुळे होमगार्डला मारहाण; पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

Pathardi Police Station : पाथर्डी  : तालुक्यातील तिसगाव येथील श्री वृद्धेश्वर विद्यालय (Shri Vriddheshwar Vidyalaya) येथे दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी देण्यास विरोध केल्याच्या कारणावरून कर्तव्यावर असलेल्या होमगार्डला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पळविल्याची (Beating) घटना घडली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…

शिवीगाळ करत मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड कृष्णा वांडेकर हे परीक्षा सुरू असताना विद्यालयाच्या पाठीमागील बाजूस कर्तव्य बजावत होते. त्यावेळी दोन जण मोटारसायकलवरून कॉपी देण्यासाठी आले होते. वांडेकर यांनी त्यांना तत्काळ तेथून निघून जाण्यास सांगून कॉपी देऊ नये, असा इशारा दिला. यामुळे संतप्त झालेल्या गणेश सचिन शिंदे व रोहित दिलीप खंदारे या दोघांनी आम्ही तिसगावचे दादा आहोत अशी दमदाटी करत वांडेकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान, खंदारे यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोन्याची चैन ओढून नेल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे.

अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद

नागरिकांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी (Pathardi Police Station)

घटना घडताच इतर सहकारी तेथे धावून आल्याने दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. शासकीय कर्तव्य बजावत असताना अडथळा आणणे, मारहाण व जबरी चोरी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पाथर्डी तालुक्यात परीक्षा काळात कॉपी पुरवण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा ऐआहे. अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे