T20 World Cup : नगर : सलग चार विजयासह टी-२० वर्ल्ड विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत सलग १२ विजय नोंदवण्याचा खास विक्रम टीम इंडियाने (Team India) आपल्या नावे केला आहे. यंदाच्या हंगामातील साखळी फेरीत दिमाखदार कामगिरी करत भारतीय संघ सुपर ८ मध्ये पोहचला आहे. उद्या (ता. २२) भारतीय संघ अहदमबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गत उविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाशी भिडणार आहे. या सामन्यात अभिषेक शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवणार का? हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण युवा फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) मागील तिन्ही सामन्यात खाते उघडण्यात अपयशी ठरला आहे. त्याचा खराब फॉर्म ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब ठरताना दिसत आहे. टीम इंडियाच्या ताफ्यातही याबद्दल चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे.
नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…
अभिषेक शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
यावर भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संघात आतापर्यंत अभिषेक शर्मा याच्या खराब फॉर्मबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ मध्ये अभिषेक शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. प्रेक्षकांनाही त्याची आक्रमक फलंदाजी आवडते. एक चांगली सुरुवात त्याला वेग पकडून देण्यास पुरेशी ठरेल, असा विश्वास मॉर्ने मॉर्केल व्यक्त केला आहे. अभिषेक शर्मा सराव सत्रात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत चर्चा करताना दिसून आला.
अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद
बराच वेळ गोलंदाजीचा सराव (T20 World Cup)
फलंदाजीसह त्याने बराच वेळ गोलंदाजीचा देखील सराव केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो गेम प्लॅनचा भाग असेल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. अभिषेक शर्मा हा मोठ्या फटकेबाजीसह संघाला धमाकेदार सुरुवात करुन देण्यासाठी ओळखला जातो. पण टी-२० वर्ल्ड कपच्या सुरवाती सामन्यात त्याच्यावर सलग तीन वेळा शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. या लाजिरवाण्या कामगिरीची कसर तो सुपर ८ मध्ये भरून काढणार का? ते पाहण्याजोगे असेल.



