Crime : शेतातील संत्रा चोरून नेणारा जेरबंद; तालुका पोलिसांची कारवाई

Crime : शेतातील संत्रा चोरून नेणारा जेरबंद; तालुका पोलिसांची कारवाई

0
Crime : शेतातील संत्रा चोरून नेणारा जेरबंद; तालुका पोलिसांची कारवाई
Crime : शेतातील संत्रा चोरून नेणारा जेरबंद; तालुका पोलिसांची कारवाई

Crime : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील दशमी गव्हाण (Dashami Gavan) येथील शेतकऱ्यांच्या (Farmers) शेतातील संत्रा चोरून नेणारा संशयित आरोपी तालुका पोलिसांनी (Taluka Police) ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून तीन लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. इरफान बाबा शेख, (रा. निंबोडी ता.जि. अहिल्यानगर ह.रा. मुकुंदनगर ता.जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अहिल्यानगर तालुक्यातील दशमी गव्हाण शिवारात असलेल्या पोपट म्हस्के या शेतकऱ्याचे ११० संत्र्याची कॅरेट चोरून नेले.

नक्की वाचा : तरुणांनी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून शेती समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

सापळा रचून आरोपी ताब्यात

याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असता अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार इरफान शेख यांनी ही चोरी केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्या नुसार पथकाने शेंडी येथे सापळा रचून आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले.

अवश्य वाचा : अभिषेकचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट? प्रशिक्षकांनी दिलं स्पष्ट उत्तर

पोलीस निरीक्षक वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई (Crime)

ही कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश सरोदे, महेश भवार, नितीन शिंदे, सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, रघुनाथ कुलांगे, विक्रांत भालसिंग, विकास शिंदे यांच्या पथकाने केली आहे.