Attack On Police Team | आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला

0

Attack On Police Team | पाथर्डी : तालुक्यातील आल्हणवाडी शिवारात आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला (Attack On Police Team) झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २१) सकाळी घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल संजय मोतीराम जाधव हे एका गुन्ह्यात हवा असलेला आरोपी कृष्णा हौसराव कर्डिले याला अटक करण्यासाठी स्टाफसह आल्हणवाडी येथे गेले होते. त्यावेळी आरोपी कृष्णा कर्डिले व त्याचे कुटुंबीयांनी पोलीस पथकाला विरोध करत शिवीगाळ, दमदाटी व झटापट केली. 

हे वाचा – पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; १९ जणांचा मृत्यू

कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न (Attack On Police Team)

यावेळी कृष्णा हौसराव कर्डिले याने “आज एकाचा तरी जीव घेतो” अशी धमकी देत हातातील कुऱ्हाडीने पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव यांनी तो वार चुकविल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच आदिनाथ त्रिंबक गोल्हार याने आरोपीस मोटारसायकलची चावी देऊन घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अवश्य वाचा- १० महिन्यांची चिमुकली ५ जणांना जीवनदान देऊन गेली!

परिसरात तणावाचे वातावरण (Attack On Police Team)

या प्रकरणी आरोपी कृष्णा हौसराव कर्डिले, हौसराव ज्ञानदेव कर्डिले, मनीषा हौसराव कर्डिले, समर्थ हौसराव कर्डिले व आदिनाथ त्रिंबक गोल्हार (सर्व रा. आल्हनवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा सहायक पोलीस निरीक्षक  निवृत्ती आगरकर हे करत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here