Cleanliness campaign | कर्जत: संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त रविशंकर विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हाती खराटा घेत स्वच्छता मोहीम (Cleanliness campaign) राबवली. विशेष म्हणजे परिपाठातील प्रार्थना चालू असताना संस्थेचे प्रमुख कार्यवाहक यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा धारण करीत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. शाळेतील शिक्षकांनी देखील त्यांना ओळखले नाही मात्र विद्यार्थ्यांनी आवाजावरून ते त्यांचे आवडते लांगोरे नाना आहेत हे ओळखले.
अवश्य वाचा- मढीची यात्रा पुन्हा वादात; मुस्लिम व्यावसायिकांना विरोध
विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या सोबत स्वच्छता मोहीम (Cleanliness campaign)
वेळ सकाळची ९:४५ वाजता रविशंकर विद्यामंदिरात सर्वच विद्यार्थी शालेय कामकाजानुसार परिपाठ आणि प्रार्थना चालू असताना चेहऱ्यावर पांढरी दाढी, अंगावर भगवा लांब लचक सदरा त्यास ठिगळ, हातात अर्धा फुटलेला खापराचे गाडगे घेत प्रवेश करतात. अचानक आलेल्या संत गाडगेबाबांच्या वेशभूषाधारक पाहुण्यांने शिक्षकांसह विद्यार्थी देखील गोंधळात पडतात. गोपाळा, गोपाळा देवकीनंदन गोपाळाचा जयघोष करीत ते पुढे जात असताना शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांनी वेशभूषाधारक संत गाडगेबाबा यांच्या देहबोलीवरून ते आपले लांगोरे नाना आहेत हे ओळखत त्यांच्याकडे धाव घेतली. शिक्षक देखील अचानक आलेले पाहुणे संस्थेचे प्रमुख असल्याचे तेव्हा कळाले. यावेळी त्यांच्या हस्तेच मग संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एवढ्यावरच शाळेच्या जयंतीचा कार्यक्रम न थांबता नंदकुमार लांगोरे यांनी आपल्या वाहनात आणलेले खराटे स्वत: हाती घेत विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या सोबत स्वच्छता मोहीम राबवत गाडगेबाबांचा संदेश प्रत्यक्ष विद्यार्थ्यांत रुजवला. या आगळ्या-वेगळ्या संत गाडगेबाबांची जयंती पालकांनी देखील कौतुक करीत काही काळ स्वच्छता मोहिमेत आपले योगदान दिले.



