Rohit Pawar: अजित दादांवरील सर्व आरोपांचे गाठोडे समुद्रात नेऊन बुडवा;रोहित पवारांची मागणी 

0
Rohit Pawar: अजित दादांवरील सर्व आरोपांचे गाठोडे समुद्रात नेऊन बुडवा;रोहित पवारांची मागणी 
Rohit Pawar: अजित दादांवरील सर्व आरोपांचे गाठोडे समुद्रात नेऊन बुडवा;रोहित पवारांची मागणी 

नगर : अजितदादांवरील सर्व आरोपांचे गाठोडे (All the allegations against Ajitdada) समुद्रात नेऊन बुडवा,अशी मागणी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केली आहे. तसेच यावेळी बोलताना काकी म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्या मदतीला मी कायम उभा असेल,असे आश्वासनही त्यांनी दिले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) चालू झाले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर विधानसभेत शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अनेक नेत्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील भाषणात अजितदादांविषयीच्या आठवणी ताज्या केल्या.

नक्की वाचा:  लव्ह मॅरेजसाठी लागणार आई-वडिलांची परवानगी? नवा कायदा नेमका काय ?

‘दादांवर नको नको ते आरोप करण्यात आले’ (Rohit Pawar)

दादांवर नको नको ते आरोप करण्यात आले रोहित पवार म्हणाले की,अजित पवार हे सभागृहात पहिला येणारा आणि शेवटी जाणारा नेता असायचे. चुकले तर कान पकडायचे व चांगले बोललो की स्तुती करायचे. व्यक्तिगत, बेकायदेशीर विषय घेऊन आलेल्यांचा त्यांना राग यायचा, अशी आठवण रोहित पवार यांनी काढली. दादांवर नको नको ते आरोप झाले. दादा तेव्हा अस्वस्थ व्हायचे. पण एकही आरोप सिद्ध करता आला नाही. दादा आता नाहीत, त्यामुळे ते आरोप व ते डाग आता पुसले पाहिजेत. आरोपांचे गाठोडे समुद्रात टाकले गेले तर ती त्यांना आदरांजली ठरेल, अशी मागणीही त्यांनी केली.

अवश्य वाचा: विनापरवाना कुणाच्या आवारात शिरल्यास कोणत्या नियमांचा भंग होतो? 

माझे लग्न हे दादांनी ठरवले होते. पक्ष वेगळा झाला तेव्हा काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील. गेल्या काही महिन्यात आमच्या बैठका झाल्या. प्रशासनावर वचक असणारा नेता गेला. लोकनेता गेला, रूबाब गेला. रांगडेपणा गेला. राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला, अशा शब्दांत त्यांनी हळहळ व्यक्त केली.

दादांच्या आरोपींना तुरूंगात टाकल्याशिवाय हा लढा थांबणार नाही (Rohit Pawar)

अजितदादा मला झिपऱ्या कमी कर म्हणायचे. राजकीय वजन वाढवत जा. शारीरिक वजन कमी कर असं बोलायचे, अशी आठवण सांगताना रोहित पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर बोलताना आता मी जो लढा लढतोय, या लढ्याबद्दल दादाही मला शाबासकी देतील, असे म्हणत दादांच्या मृत्यूबद्दल आरोपींना तुरूंगात टाकल्याशिवाय हा लढा थांबणार नाही,असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला.