Prohibition movement | अकोलेच्या दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांची पोलीस अधीक्षकांसोबत बैठक

पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने कडक पावले उचलावीत

0

अकोले: पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे रविवारी (ता.२२) अकोलेत आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अवैध दारू विषयावर महत्वपूर्ण बैठक (Prohibition movement) झाली. या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे उपस्थित होते. अकोले तालुक्यात संगमनेर, सिन्नर तालुक्यातून येणारी दारू, गुन्हे दाखल करताना होणारी पळवाट, राजूरमध्ये दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात विकली जाणारी दारू हे सारे मुद्दे समोर आणून त्यावर चर्चा झाली. ज्या गावात अवैध दारू सापडेल तिथे बीट अंमलदार व पोलीस पाटील यांच्यावर कारवाई करावी, त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी अशी महत्वाची मागणी दारूबंदी चळवळीचे (Prohibition movement) कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, मच्छिंद्र देशमुख, संतोष मुतडक, हरीभाऊ फापाळे, कैलास आरोटे, येलमामे, गोरक्ष खाडगीर यांनी केली.

अवश्य वाचा- आमदार रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने कडक पावले उचलावीत (Prohibition movement)

संगमनेर शहरातील तीन दुकाने, सिन्नर तालुक्यातील दोन दुकाने, घारगाव येथील आणि शेंडी येथील दुकानातून येणारी दारू जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत अकोले तालुक्यातील अवैध दारू थांबणार नाही असे कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे रात्रीच्या वेळी गावागावात पोहोचवली जाणारी दारू थांबवण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने कडक पावले उचलावीत अशी मागणी केली.