Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची अपडेट आली समोर; डॉ. ग्रँड यांनी दिली माहिती

Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची अपडेट आली समोर; डॉ. ग्रँड यांनी दिली माहिती

0
Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची अपडेट आली समोर; डॉ. ग्रँड यांनी दिली माहिती
Sharad Pawar : शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची अपडेट आली समोर; डॉ. ग्रँड यांनी दिली माहिती

Sharad Pawar : नगर : पुण्यातील रुबी हॉल क्लिनीक (Ruby Hall Clinic) येथे उपचार सुरू असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की, त्यांच्या छातीत इन्फेक्शन (Chest infection) झाले होते. मात्र योग्य उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले आहेत. उद्या (ता.२५) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

नक्की वाचा : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध ; दोषींवर कारवाईची मागणी

शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली

डॉ. परवेझ ग्रँड यांनी सांगितले की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली आहे. उद्या (ता.२५) सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा प्रवास करू शकतील.

अवश्य वाचा : सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता (Sharad Pawar)

दरम्यान, पवार यांच्या प्रकृतीबाबत विविध अफवा पसरत आहे. याबाबत डॉक्टरांनी खुलासा करून त्यांच्या समर्थकांना दिलासा दिला आहे. उद्या डिस्चार्जनंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.