Local Crime Branch : नगर : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरात दोरीने गळा आवळून खून (Murder) करणाऱ्या संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. जावयाने त्याच्या मित्रासह सासऱ्याचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अमित नारायण डुकरे (वय-३४ रा. पारगाव तर्फे आळे, ता.जुन्नर जि.पुणे), अमोल उत्तम डुकरे (वय- ३१ रा. औरंगपुर, ता.जुन्नर जि.पुणे), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची (Suspected Accused) नावे आहेत.
हेही वाचा : खटल्यास विलंब; पाथर्डी तुरुंगाधिकारी व पोलिसांच्या चौकशीचे न्यायालयाने दिले आदेश
सापळा रचून आरोपीस घेतले ताब्यात
22 फेब्रुवारी रोजी ढवळपुरी शिवारात रामदास निवृत्ती सोनवणे (वय- ५५, रा.निमगाव सावा, ता.जुन्नर जि.पुणे) यांचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळुन खून केल्याचे घटना समोर आली होती. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात कोणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा मयताच्या जावयाने त्याच्या मित्रासह केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.
नक्की पहा : महिलांच्या 70 टक्के समस्या संपतील; फक्त ‘या’ 4 गोष्टी फॉलो करा
मुलीस मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा राग (Local Crime Branch)
ताब्यात घेतलेले संशयित आरोपींकडे चौकशी केली असता त्यांने सांगीतले की त्याची पत्नी ही सुमारे एक वर्षापासुन नांदत नसुन त्याला एक सव्वा वर्षाची मुलगी आहे. सासरा हा वारंवार वाद घालुन माझी मुलगी हिस मारुन टाकण्याची धमकी देत होता. त्याचा राग आल्याने आरोपी अमित नारायण डुकरे याने व त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे याने रामदास निवृत्ती सोवणे याचा गळा दोरीने आवळून खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, दीपक घाटकर, रिचर्ड गायकवाड, अमृत आढाव, रमिझराजा आत्तार, आकाश काळे, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली आहे.



