Armed Attack : न्यायालयात साक्ष देऊन परतणाऱ्या दोन तरुणांवर २५ जणांचा सशस्त्र हल्ला

Armed Attack : न्यायालयात साक्ष देऊन परतणाऱ्या दोन तरुणांवर २५ जणांचा सशस्त्र हल्ला

0
Armed Attack : न्यायालयात साक्ष देऊन परतणाऱ्या दोन तरुणांवर २५ जणांचा सशस्त्र हल्ला
Armed Attack : न्यायालयात साक्ष देऊन परतणाऱ्या दोन तरुणांवर २५ जणांचा सशस्त्र हल्ला

Armed Attack : नगर : कोपरगाव शहरात काल (ता. २४) भरदिवसा कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची धक्कादायक घटना घडली. न्यायालयात (Court) तारीख असल्याने साक्ष देण्यासाठी आलेल्या ब्राह्मणगाव येथील दोन तरुणांवर २० ते २५ जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला (Armed Attack) केला. या हल्ल्यात राहूल अप्पा पवार हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार (Treatment) सुरू आहेत.

हेही वाचा : राहाता शहराजवळील जैन मंदिरातील मोठा दरोड्याचा प्रयत्न फसला

आरोपी पसार

ब्राह्मणगाव येथील राहुल अप्पा पवार आणि विशाल केशव मोरे हे दोघे मंगळवारी सकाळी न्यायालयाचे कामकाज आटोपून धारणगाव रस्त्यावरून गावाकडे परतत होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून काही अंतरावर असताना, दबा धरून बसलेल्या मोठ्या टोळक्याने त्यांना अडविले. काही समजण्याच्या आतच चॉपर, लाठ्या आणि काठ्यांनी या दोघांवर हल्ला चढवण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. हल्लेखोरांनी राहुल पवार याला लक्ष करत चॉपरने गंभीर वार केले, तर विशाल मोरे याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हे पहा : राहुरीत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गुरुजींचा थेट ‘होम व्हिजिट’ पॅटर्न!

जत्रेतील जुन्या वादातून हल्ला (Armed Attack)

प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गावातील जत्रेत झालेल्या भांडणाच्या रागातून हा पूर्वनियोजित हल्ला झाला असल्याची चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात आहे. या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे कोपरगाव शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.