Terrible Accident : श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर (State Road) ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात (Accident) एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा भीषण अपघात (Terrible Accident) झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा: ‘लाल वादळ’ संगमनेरात धडकले; प्रलंबित मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांचा लोणीच्या दिशेने
ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकला धडक
याबाबत अधिक माहिती अशी की,आज दि.२५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर शहराजवळील खंडाळा गाव परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर रोडवर स्विफ्ट कारची ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसली.ही धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
सहा सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू (Terrible Accident)
जखमींना आजूबाजूच्या लोकांनी तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध संतोष वडापाव चे मालक चव्हाण यांच्या परिवारातील सहा सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दूर्दैवी घटनेमुळे चव्हाण परिवारासह नातेवाईक व मित्र परिवार यांच्यामध्ये शोककळा पसरली आहे.



