Attack : महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॉडने हल्ला; गुन्हा दाखल

Attack : महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॉडने हल्ला; गुन्हा दाखल

0
Attack : महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॉडने हल्ला; गुन्हा दाखल
Attack : महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॉडने हल्ला; गुन्हा दाखल

Attack : नगर : अहिल्यानगर शहरातील एका महाविद्यालयात १२ वीच्या पेपरसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला (Attack) करण्यात आला. या घटनेत मुन्सिपल कॉलनी, सिध्दार्थनगर येथील १७ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी (Seriously Injured) झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) दोन मुलांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन

दुचाकीवरून कट मारल्याने वाद

फिर्यादी हा १२ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असून बुधवारी आपल्या मित्रासोबत परीक्षेचा सिट नंबर व बेंच पाहण्यासाठी महाविद्यालयात गेला होता. यावेळी त्याच महाविद्यालयातील एका ओळखीच्या मुलाने दुचाकीवरून येत फिर्यादीला कट मारला. यावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D

शैक्षणिक परिसरात खळबळ (Attack)

संतापलेल्या त्या मुलाने आपल्या बॅगेतून लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. दोघांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमीला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे शैक्षणिक परिसरात खळबळ उडाली आहे.