Hind Di Chadar : खारघर येथील ऐतिहासिक ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून अनुयायांची उपस्थिती

Hind Di Chadar : खारघर येथील ऐतिहासिक ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून अनुयायांची उपस्थिती

0
Hind Di Chadar : खारघर येथील ऐतिहासिक ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून अनुयायांची उपस्थिती
Hind Di Chadar : खारघर येथील ऐतिहासिक ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून अनुयायांची उपस्थिती

३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जय्यत तयारी; प्रशासनाकडून चोख नियोजन

Hind Di Chadar : नगर : ‘हिंद-दी-चादर’ (Hind Di Chadar) श्री गुरु तेग बहादुर साहिबजी (Shri Guru Tegh Bahadurji) यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवीमुंबई (Navi Mumbai) येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित भव्य कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून शीख, बंजारा, सिंधी व इतर समाजातील अनुयायी उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून भाविकांच्या सोयीसाठी चोख नियोजन करण्यात आले आहे.

नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन

समाज बांधवांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन

खारघर, नवी मुंबई मतल ओवे येथे हा मुख्य सोहळा पार पडणार आहे. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती आणि विविध समाज बांधवांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D

भाविकांसाठी निवासाची सोय (Hind Di Chadar)

राज्याचे मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याची व्यापक तयारी केली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी २५ विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी निवास, भोजन, आरोग्य व वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात आली आहे. कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांसाठी शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागांवर निवासाची सोय करण्यात आली असून, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष वाहनतळ (पार्किंग) व्यवस्था उभारण्यात आली आहे.

या सोहळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन, श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग व बलिदानाचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी व अनुयायांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व शीख समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.