Sub-District Hospital : राहाता : राहाता शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या, ग्रामीण भागातील रुग्णांची वाढती गरज आणि तातडीच्या आरोग्यसेवेचा अभाव लक्षात घेता राहाता येथील ग्रामीण रुग्णालयाचे दर्जोन्नती करून तेथे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय (Sub-District Hospital) स्थापन करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा (Dr. Rajendra Pipada) यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर (Prakash Abitkar) यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
नक्की वाचा : आमदार खताळ यांनी आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा विभागावर ओढले ताशेरे; राज्य सरकारचे वेधले लक्ष
राहाता तालुका धार्मिक पर्यटन क्षेत्राशी निगडित
जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीरामपुर, पारनेर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले, संगमनेर, राजुर या तालुक्यात उपजिल्हा रुग्णालये मंजूर झालेली आहे. असे असताना राहाता तालुक्यातच उपजिल्हा रुग्णालय कोणाच्या दबावापोटी होत नाही असा प्रश्नही डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी मंत्र्यांना विचारला.डॉ. पिपाडा यांनी नमूद केले की, राहाता तालुका शिर्डी आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन क्षेत्राशी निगडित असल्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची ये-जा असते. अपघात, आपत्कालीन उपचार, प्रसूती सेवा व विशेष उपचारांसाठी नागरिकांना अहिल्यानगर किंवा इतर ठिकाणी जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर सक्षम उपजिल्हा रुग्णालयाची गरज आहे. जिल्ह्यात इतर ब-याच तालुक्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालये आहेत.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
मोठ्या शहरांवरील ताणही कमी होईल (Sub-District Hospital)
पिपाडा यांनी आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांना विनंती केली आहे की, राहाता तसेच परिसरातील हजारो नागरिक व भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या मागणीस तातडीने मान्यता देऊन निधी मंजूर करावा. उपजिल्हा रुग्णालय उभारल्यास स्थानिक नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल आणि मोठ्या शहरांवरील ताणही कमी होईल.



