Hindu Sammelan : पाथर्डीत उद्या हिंदू संमेलन

Hindu Sammelan : पाथर्डीत उद्या हिंदू संमेलन

0
Hindu Sammelan : पाथर्डीत उद्या हिंदू संमेलन
Hindu Sammelan : पाथर्डीत उद्या हिंदू संमेलन

Hindu Sammelan : पाथर्डी : हिंदू समाजात एकता व संघटन वाढवण्यासाठी तसेच जात, पंथ व भाषा यांतील भेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचा संदेश देण्यासाठी पाथर्डी (Pathardi) शहरात हिंदू संमेलनाचे (Hindu Sammelan) आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्म (Hinduism), परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करत राष्ट्रीयत्व व देशभक्तीची भावना जागृत करणे हा या संमेलनामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन

सामाजिक ऐक्य या विषयावर मार्गदर्शन

हे संमेलन शनिवार (ता. २८) फेब्रुवारी सायंकाळी पाथर्डी शहरातील अजंठा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. संमेलनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाहक सचिन कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे आदिनाथ महाराज शास्त्री यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ते धर्म, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D

हिंदू रक्षा युवा मंच यांचा सहभाग (Hindu Sammelan)

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सीए, मास्टर ऑफ इकॉनॉमी, मास्टर ऑफ कॉमर्स अॅड. सर्वेश मेहंदळे हे हिंदू समाजातील संघटन, राष्ट्रीय विचारसरणी आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर आपले विचार मांडणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन पाथर्डी हिंदू संमेलन समिती यांनी केले आहे. स्वागतोत्सुक म्हणून हिंदू रक्षा युवा मंच यांनी सहभाग नोंदविला आहे. हिंदू समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रनिष्ठा दृढ करण्यासाठी हिंदू समाजातील सर्व बांधव व भगिनींनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू संमेलन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.