Marathi Language | नगर : आम्हा मराठी भाषेला (Marathi Language) संस्कृतीला हजारो वर्षाची परंपरा आहे. जागतिकीकरणाचे वारे सर्वत्र वाहत असताना आमच्या माय मराठीचे नाव साता समुद्र पार जाण्यासाठी आम्ही मराठी माणसांनीच आपल्या बोलण्यात, वाचण्यात, लिहिण्यात तिचा अंगीकार केला तर आम्हीच मराठी भाषेचे गौरव विधाते होऊ असा आशावाद ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मेधा काळे यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
पुस्तक रसग्रहण व चारोळ्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण (Marathi Language)
प्रसिद्ध लेखक विष्णू वामन शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन व मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्हा वाचनालयात आयोजित पुस्तक रसग्रहण व चारोळ्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रा. काळे बोलत होत्या.
हेही वाचा – ‘भिताड’ कादंबरीत समाजातील वास्तव चित्रण; समीक्षक डॉ. सुधाकर शेलार यांचे मत
यांची उपस्थिती (Marathi Language)
कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष प्रा शिरीष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, संचालिका शिल्पा रसाळ, संचालक किरण आगरवाल, पुस्तक रसग्रहण व चारोळी स्पर्धेच्या परीक्षक “रेघोट्याच्या निर्मात्या” साधना कसपटे – महानोर, ग्रंथपाल अमोल इथापे, शामल महानोर, सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल आदी उपस्थित होते.
अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी प्रास्ताविकात “वाचनालय आणि पुस्तके यांची भाषा संवर्धनात मोठी भूमिका आहे. सुमारे दोन शतके हा वारसा अहिल्यानगर जिल्हा वाचनालय हवेलीतपणे चालू आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कृतीतून, वाचण्यातून ही माय मराठी समृद्ध करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चारोळी स्पर्धेच्या परीक्षिका साधना कसपटे- महानूर यांनी आपल्या महत्त्वपूर्ण मनोगतात “आपण सातत्याने पुस्तके वाचले तर आपला शब्द संग्रह, कल्पनाशक्ती व ज्ञान यांनी वाचक समृद्ध होतो. यातूनच पुढे मराठीतून चांगला सुसंवाद, लेखन व आपसुकच मराठी भाषा ही समृद्ध होईल. त्यासाठी आपण रोजच्या जीवनात दर्जेदार पुस्तकांचे वाचन, मराठीचा जाणीवपूर्वक सुसंवाद प्रत्येकाची भूमिका आणि जबाबदारी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
हे पहा – स्पा माफियांचे धाबे दणाणले! एका मृत्यूनं पोलीस कारवाईवरच प्रश्नचिन्ह?
यावेळी चारोळी स्पर्धेतील विजेते प्रथम -संकेत फाटक, द्वितीय – तनिषा शाह, तृतीय – दत्ता पवार, उत्तेजनार्थ सुरेखा घोलप, अजय शुक्ल, संजय सोनवणे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मान्यवरांचा सन्मान प्रा. शिरीष मोडक, शिल्पा रसाळ, किरण आगरवाल यांच्या हस्ते करण्यात आला. संचालिका शिल्पा रसाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपस्थित मान्यवरांचे ग्रंथपाल अमोल इथापे यांनी आभार मानले.यावेळी स्पर्धेतील स्पर्धक वाचक तसेच वाचनालयाचे कर्मचारी वर्षा जोशी, संजय गाडेकर, आर्यन मडूर, शेख सिकंदर यांचे सहकार्य मिळाले.



