
Job Fair : नगर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (District Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Centre), जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय (अहिल्यानगर), युथ फॉर जॉब्स, ज्योत्स्ना उद्योग केंद्र (कार्यशाळा) आणि भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत (Government of India Ministry of Labor and Employment) असलेल्या नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता दिव्यांग उमेदवारांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळाव्याचे (Job Fair) आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ज्योत्स्ना उद्योग केंद्र, कार्यशाळा (मतिमंद मुलांची शाळा), टिळक रोड, स्वस्तिक चौक, अहिल्यानगर येथे पार पडेल. दिव्यांग उमेदवारांनी रोजगाराच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.
नक्की वाचा: ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ हे पत्रक बनावट!; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्टीकरण
प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड
या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील १२ ते १५ नामांकित उद्योजक सहभागी होणार असून, ते प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करतील. तसेच, नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर (मुंबई) यांच्यामार्फत निःशुल्क करिअर मार्गदर्शन, व्यावसायिक पुनर्वसन व एनसीएस (NCS) नोंदणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
नोकरीस इच्छुक उमेदवारांना सुचना (Job Fair)
जिल्ह्यातील नोकरीस इच्छुक असलेल्या सर्व दिव्यांग उमेदवारांनी (एस.एस.सी. / एच.एस.सी. / पदवीधर – बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आदी) www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी आणि आपल्या पात्रतेनुसार उद्योजकांकडे अर्ज करावेत. मेळाव्याच्या ठिकाणी येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि बायोडाटा या सर्वांच्या प्रत्येकी तीन प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०२४१-२९९५७३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, रोजगार मेळावा समन्वयक विजय सातव (९९७५१६४६९३), वसीमखान पठाण (९४०९५५५४६५), रुपेश कोकाटे (९१४६६०४७२०), बाजीराव सानप (९०११९३१०७४) आणि योगेश झांजे (९५८८४०८८९०) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल, असेही कळविण्यात आले आहे.


