Burglary : अहिल्यानगर शहरात सकाळी कचरा गोळा करण्यासाठी यायची आणि घरफोडी करून जायची

Burglary : अहिल्यानगर शहरात सकाळी कचरा गोळा करण्यासाठी यायची आणि घरफोडी करून जायची

0
Burglary : अहिल्यानगर शहरात सकाळी कचरा गोळा करण्यासाठी यायची आणि घरफोडी करून जायची
Burglary : अहिल्यानगर शहरात सकाळी कचरा गोळा करण्यासाठी यायची आणि घरफोडी करून जायची

स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी करणारी महिला जेरबंद

Burglary : नगर : अहिल्यानगर शहरात सकाळच्या वेळी घरफोडी (Burglary) करणारी महिला स्थानिक गुन्हे शाखेची (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेकडून २८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सविता अर्जु कुचेकर (वय- ४२), रा.नालेगाव ता. जि. अहिल्यानगर ), असे ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेचे नाव (Suspected accused woman) आहे.

नक्की वाचा: ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ हे पत्रक बनावट!; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्टीकरण

याबाबत माहिती अशी की,

फिर्यादी आनंद रतिलाल मुथा यांच्या अरिहंत आपारमेंट येथील १९ फेब्रुवारी रोजी घराचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटातुन रोख रक्कम व चांदीचे वस्तु, पितळी भांडे असा एकुण ७३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेचा समांतर तपास करत असता स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या वेळी कचरा वेचणारी महिला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरी केलेला २८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या महिलेने दोन ठिकाणी घरफोडी केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D

यांच्या पथकाने केली कारवाई (Burglary)

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुनील पवार, शाहीद शेख, गणेश धोत्रे, दीपक घाटकर, फुरकान शेख, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांच्या पथकाने केली आहे.