
Chess Selection Test Tournament : नगर: अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत (Ahilya Nagar District Chess Association) १७ वर्षांच्या खालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा (Chess Selection Test Tournament) आयाेजीत केली आहे. म्हणजे १/१/२००८ नंतर जन्मलेले नगर जिल्ह्यातील खेळाडू या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
नक्की वाचा: ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ हे पत्रक बनावट!; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्टीकरण
राज्य स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार
नगर येथील जसवानी मास्टर्स क्लब चेस अकॅडमी, ओबेरॉय हॉटेल समोरील सिविल हडको नियर पोस्ट ऑफिस, सावेडी, अहिल्यानगर येथे सदरील स्पर्धेचे नियोजन केले असून मंगळवार दि. ०३ मार्च रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन केले जाईल. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी अहिल्या नगर जिल्ह्याचा मुलांचा व मुलींचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे. अंतिम निकाल पत्रका प्रमाणे २ मुले व २ मुली, म्हणजेच प्रथम २ खेळाडू राज्यस्तरावर पाठविण्यात येतील. अहिल्या नगर जिल्ह्यातून निवड झालेल्या खेळाडूंची राज्य निवड चाचणी स्पर्धेची प्रवेश फी, रू १०००/- संघटनेमार्फत भरली जाईल व तेथे राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल तसेच पहिल्या पाच खेळाडूंना (मुले व मुली) आकर्षक करंडक सुद्धा देऊन गौरविण्यात येणार आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
प्रवेश ऑनलाईन स्वीकारले जाणार (Chess Selection Test Tournament)
सदरील स्पर्धा १७ वर्षा खालील मुले व मुली खेळाडूं साठी खुली असून खेळाडूंनी येताना बुद्धिबळ पट, सोंगट्या, जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी आणावे. सर्व सहभागी खेळाडूंनी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रवेश ऑनलाईन किंवा वॉट्अप वर स्वीकारले जाणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रयत्नशील असून अहिल्या नगर जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी उत्फुर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे.
सदर निवड चाचणी स्पर्धेतील प्रवेश नोंदणी करता प्रवेश व अधिक माहितीकरिता:-
१) यशवंत बापट
२) पारूनाथ ढोकळे
३) मनीष जसवानी
४) प्रशांत धंगेकर
५) देवेंद्र ढोकळे
संपर्क साधावा असे अवाहन अहिल्या नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे.


