
Sant Sadguru Godad Maharaj : कर्जत : संत सदगुरु गोदड महाराज (Sant Sadguru Godad Maharaj) हे अठरा-पगड जातींसाठी श्रद्धास्थान आहे. त्यांची अस्मिता आणि पावित्र्य सर्वांनीच जपले पाहिजे. राजकीय (Political) मतभेद मंदिराच्या आणि गावाच्या बाहेर करावे. ट्रस्टमध्ये (Trust) सर्व जाती-धर्मांना स्थान असावे. ती कोणा एका कुटुंबाची मक्तेदारी नसावी. ज्यांनी संत सदगुरु गोदड महाराजांची सेवा, भक्ती केली त्यांनाच बाजूला करण्याचे पाप काही मंडळी करीत असून हे महाराजांचे भक्त कधीच खपवून घेणार नाहीत. समस्त कर्जतकरांना अंधारात ठेवत अनधिकृत ट्रस्ट स्थापन झाले आहे ते तातडीने बरखास्त करण्याची मागणी आंदोलनकर्त्यां केली.
नक्की वाचा: ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ हे पत्रक बनावट!; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्टीकरण

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न
शनिवारी कर्जतचे ग्रामदैवत संत सदगुरू गोदड महाराज समाधी मंदिर येथे अनाधिकृतपणे व एकाधिकारशाहीने रथयात्रा उत्सव, जन्मोत्सव, पालखी उत्सव, समाधी सोहळा (भंडारा), अखंड हरिनाम सप्ताह उत्सवातील मानकरी तसेच गोदड महाराजांनी पूजेचा मान दिलेले पुजारी तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांना अंधारात ठेवून ट्रस्ट स्थापन केल्याच्या निषेधार्थ मंदिरासमोर धरणे आंदोलन करीत कर्जत बंदची हाक देण्यात आली होती. या प्रसंगी मानकरी संतोष नलवडे, नामदेव राऊत, दत्तात्रय शिंदे, आप्पा तोरडमल, अंबादास पिसाळ, अॅड बाळासाहेब शिंदे, संतोष मेहेत्रे यांच्यासह आदींनी धर्मदाय आयुक्त यांच्या मनमानी कारभारा विरोधात आणि गावातीलच काही मोजक्या मंडळी मंदिराचे पावित्र्य धोक्यात आणून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
मंदिरात कोणी ही राजकारण आणू नये (Sant Sadguru Godad Maharaj)
वास्तविक पाहता संत सदगुरु गोदड महाराजांचे मंदिर हे सर्वांसाठी श्रद्धास्थान असताना मागील काही दिवसांपासून या ठिकाणी सर्वच धार्मिक कार्य वेगवेगळे करण्याचा पायंडा पडला आहे. हे समस्त कर्जतकर, पूजेकरी, मानकरी, सेवेकरी आणि भाविक भक्तांना न रुचणारे आहे. यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे. यामुळे संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात कोणी ही राजकारण आणू नये. आणि झालेला राजकीय विळखा तात्काळ दूर करावा तसेच मंदिराचे पावित्र्य सर्वांनी अबाधित राखावे असे आवाहन उपस्थितांनी केले. यावेळी सर्वच आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त करताना सदरचे अनधिकृत ट्रस्ट धर्मादाय आयुक्त आणि लोकप्रतिनिधी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनी लोकभावना लक्षात घेऊन तातडीने बरखास्त करावे अशी एकमुखी मागणी केली. यावेळी प्रशासनास जाग आणण्यासाठी मंदिराच्या समोर भजन, कीर्तन करण्यात आले.


