Marathi Bhasha Gaurav Din : राहाता न्यायालयात “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात साजरा

Marathi Bhasha Gaurav Din : राहाता न्यायालयात "मराठी भाषा गौरव दिन" उत्साहात साजरा

0
Marathi Bhasha Gaurav Din : राहाता न्यायालयात
Marathi Bhasha Gaurav Din : राहाता न्यायालयात "मराठी भाषा गौरव दिन" उत्साहात साजरा

Marathi Bhasha Gaurav Din : राहाता : राहाता तालुका विधी सेवा समिती व राहाता तालुका वकील (Lawyers) संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “मराठी भाषा गौरव दिन” (Marathi Bhasha Gaurav Din) न्यायालयात (Court) उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधिश (Judge) आर.एस.गुप्ता साहेब होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक सर्जेराव मते व राहाता तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे उपस्थित होते. तसेच या समारंभास वरिष्ठ स्तर न्यायाधिश एस. बी .शेख साहेब, एन.एन.जोशी मॅडम, के.सी.रजपुत साहेब, एस.एस.तट साहेब, तसेच कनिष्ठ स्तर न्यायाधीश पी.आर.फुलारी साहेब, एस.आर.भरट साहेब, प्रसाद गिरगावकर साहेब हे सर्व उपस्थित होते.

नक्की वाचा : पारनेर शहरामध्ये बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याचा निर्णय

भाषा म्हणजे जिवंत लोकांचे व तेजस्वीपणाचे लक्षण

या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलतांना सर्जेराव मते म्हणाले की, दरवर्षी (ता. २७) फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे जेष्ठ कवी वि.वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. भाषा म्हणजे जिवंत लोकांचे व तेजस्वीपणाचे लक्षण आहे. भाषा म्हणजे लोकसमुहाला एक बनविण्याचे आणि एकत्र ठेवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. भाषेमध्ये बोलीभाषेलाही महत्व आहे. मराठीमध्ये कोकणी, मराठवाडी, वज्हाडी, खान्देशी, अशा विविध बोली भाषा सामावलेल्या आहेत. जपान, चीन सारख्या देशांनी आपल्या भाषेतूनच प्रगती केलेली पहावयास मिळते. तसेच आपल्याकडेही न्यायदान, वौद्यकिय, व्यावसायिक, या क्षेत्रात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्यास सामान्यांना त्याचा फायदा होईल.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D

साता समुद्रापारही मराठी भाषेचा डंका (Marathi Bhasha Gaurav Din)

मराठी भाषेला पुरातन परंपरा आहे. संत,कवी, लेखक, शाहीर, ग्रंथकार, यांनी ती समृध्द केलेली पहावयास मिळते. साता समुद्रापारही मराठी भाषेचा डंका आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. शब्दांचा क्रम, शब्द वापरण्याचे ठिकाण, शब्द उच्चारतानाचे चढ उतार तसेच त्यांचा योग्य वापर केल्यास होणारा अर्थबदल या विषयीचे विविध किस्से सांगुन त्यांनी सर्वांना खिळवून ठेवले. आपण सर्वांनी सर्वच क्षेत्रात मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास मराठीला खऱ्या अर्थाने वौभव प्राप्त होईल असेही ते म्हणाले. या अगोदर न्यायमुर्ती गुप्ता साहेब यांच्या हस्ते पाहूण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी चौधरी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला तर ॲड. अनिल शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. शेवटी ॲड. सागर जपे यांनी आभार मानले. या समारंभास सर्व न्यायाधिश, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होत