Nilesh Lanke | नगर : गोव्याला जाण्यासाठी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शनिवारी (ता. २८) सायंकाळी साडेचारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचले. मात्र, विमानाने उड्डाण घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. वेळेवर पोहोचूनही विमान सुटल्याने खासदार लंके यांनी संताप व्यक्त करीत इंडिगोच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली.
अवश्य वाचा- कर्जतमध्ये बंद पाळत गोदड महाराज मंदिरासमोर धरणे आंदोलन; ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी
शाब्दिक चकमक (Nilesh Lanke)
अधिकाऱ्यांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक उडाली. या घटनेनंतर खा. लंके हे पुण्याकडे रवाना झाले. या प्रकारामुळे काही काळ विमानतळ परिसरात चर्चेला उधाण आले होते. यासंदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हे पहा – रात्री इंटरनेट चालू ठेवणं पडू शकतं महागात!
अधिवेशनात बोलणार (Nilesh Lanke)
निलेश लंके यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग येथे रविवारी होणाऱ्या गडसंवर्धन स्वच्छता मोहिमेसाठी गोव्याहून जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दुपारी साडेचार वाजता पोहोचलो. परंतु, वेळेच्या आधीच विमान गेले. इंडिगोच्या व्यवस्थापकांशी बोललो. तेव्हा विमान ‘फुल’ होते, असे त्यांनी सांगितले. परंतु, हे चुकीचे आहे. विमानांना उशीर होतो. तेव्हा पैसे परत मिळत नाहीत. अशा परिस्थितीत वेळेपूर्वी विमान जाण्याचाही प्रकार चुकीचा आहे. याविषयी अधिवेशनात मी बोलणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.



