India vs West Indies | नगर : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर ८मध्ये आज (ता. १) कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) असा चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा ५ गडी राखून पराभव केला. भारताने या विजयासह दिमाखात उपात्यफेरीत प्रवेश केला. उपांत्यफेरीत ५ मार्चला भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर होणार आहे.
अवश्य वाचा- कर्जतमध्ये बंद पाळत गोदड महाराज मंदिरासमोर धरणे आंदोलन; ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी
वेस्ट इंडीजने सुरुवात चांगली (India vs West Indies)
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीजने सुरुवात चांगली केली. भारतीय गोलंदाजांना वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना नियंत्रणात आणणे कठीण गेले. भारताला पहिले यश कर्णधार शई होपला बाद केल्यावर मिळाले. होपने ३२ धावा केल्या. रॉस्टन चेझने ४०, जेसन होल्डरने नाबाद ३७ तर रोव्हमन पॉवेल नाबाद ३४ धावा केल्या. भारताकडून जसप्रित बुमराने दोन तर हार्दिक पांड्या व वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. वेस्ट इंडीजने २० षटकांत चार गडी गमावत १९५ धावा जमविल्या.
हे वाचा – श्रीगोंद्यात भक्तीचा महाकुंभ!; ‘शेख महंमद महाराज’ यात्रेत लाखांचा जनसागर
भारतीय संघाची सुरुवात खराब (India vs West Indies)
१९६ धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा अवघ्या १० धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला इशान किशनही १० धावा काढून बाद झाला. मैदानात आलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने सलामीवीर संजीव सॅमसंगला बरोबर घेत संघाला सावरले. दोघांनी ६० धावांची महत्वपूर्ण भागेदारी केली. यात संजीवने आक्रमक तर सूर्यकुमारने सावध खेळ केली. मात्र, सूर्यकुमार धावगती वाढविण्याच्या प्रयत्नात १८ धावा काढून झेलबाद झाला.सूर्यकुमार बाद झाल्यावर मैदानात आलेल्या तिलक वर्माने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. संजीवनेही त्याला साथ दिली. दोघांनी ४२ धावांची महत्वपूर्ण भागेदारी केली. आक्रमक खेळी करण्याच्या प्रयत्नात तिलक वर्मा १५ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. संजीवने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला. भारताला शेवटच्या पाच षटकांत ५० धावांची अवश्यकता होती. १६ व्या षटकात १४ धावा काढण्यात आल्या. या षटकानंतर भारतीय संघाला विजय दृष्टीपथात आला.
हे वाचा – वेळेआधी विमानाने केले उड्डाण; खासदार निलेश लंकेंचा पारा चढला
शेवटच्या दोन षटकांत केवळ १७ धावांची अवश्यता होती. यातच हार्दिक पांड्या १७ धावा करून बाद झाला. मात्र, संजीव सॅमसंगने मैदानात नांगर टाकला आणि शुभम दुबेला बरोबर घेत भारताला सहज विजय मिळवून दिला. संजीवने ५० चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. या विजयाने भारताला उपांत्यफेरीत प्रवेश मिळवून दिला. भारतीय संघाने १९.२ षटकांत पाच गडी गमावत १९९ धावा केल्या.



