Ahilyanagar | अहिल्यानगर जिल्ह्यात ५३ हजार विद्यार्थ्यांकडून ‘अपार’ ओळखपत्र तयार करणे बाकी

0

Ahilyanagar | नगर : विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली होती. या मुदतीत विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव व शैक्षणिक नोंदीतील नाव एकसमान करून ओळखपत्र निर्मिती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्याप अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात ५२ हजार ९७६ विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र काढण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यात ८ लाख ३८ हजार ७१८ विद्यार्थ्यांपैकी ७ लाख ८५ हजार ४०४ अपार कार्ड काढण्यात आलेले आहे. त्याची टक्केवारी ९३.६८ टक्के आहे.

नक्की वाचा: विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अमानुष वागणुकीबाबत खताळ यांनी वेधले लक्ष; कारवाईची मागणी

अपार नोंदीची प्रमाणिकरण (Ahilyanagar)

यापूर्वी विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्र तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर सरकार पातळीवरून कोणत्याच सूचना न आल्याने गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात अपार नोंदणीचे काम संथगतीने सुरू आहे. दरम्यान यापूर्वी नोंदणी झालेल्या अपार नोंदीची प्रमाणिकरण सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पहिली ते बारावी, अशा एकूण ५ हजार २६२ शाळांत ८ लाख ३८ हजार ८५८ विद्यार्थी आहेत. त्यातील ७ लाख ८५ हजार ४०४ विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले असून ७ लाख ८५ हजार ७४२ जण (९३.६८ टक्के) अपार प्रमाणपत्र काढण्यात आलेले आहेत. तर ५२ हजार ९७६ विद्यार्थ्यांचे अपार अद्यापही काढलेले नाही.

अवश्य वाचा – संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी लावणार – पालकमंत्री विखे पाटील

एकात्मिक शैक्षणिक ओळख क्रमांक (Ahilyanagar)

अनेक तांत्रिक अडथळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारा एकात्मिक शैक्षणिक ओळख क्रमांक म्हणजे अपार आयडी होय. तो नसल्यास डिजिटल शैक्षणिक नोंदींमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पालकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहनही करण्यात येत आहे. आधारकार्ड व शालेय नोंदी दरम्यान नावात तफावत, पालकांची माहिती अपूर्ण असणे, तसेच तांत्रिक अडथळे या प्रमुख अडचणी येत आहेत.

आयडीसाठी सक्ती नाही शाळेमार्फत किंवा अधिकृत पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून अपार आयडी तयार करता येतो. अपार आयडीसाठी पालकांचे संमतीपत्र पालकांनी भरून स्वाक्षरी करून शाळेमध्ये देणे आवश्यक असते. शासनाकडून अपार आयडीसाठी सक्ती केलेली नाही. मात्र सीईटी, नीट, जेईई अशा प्रवेश परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी अपार आयडी लागत आहे. रविवार (दि. २) मार्च रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी यांनी शिक्षण विभागातील अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी व संबंधीतांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत रखडलेली अपार प्रमाणपत्र नोंदणी, आधार कार्ड नोंदणी, माजी संघ नोंदणी आणि वाचन कट्टा याबाबत आढावा घेतला. तसेच रखडलेले उपक्रम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

हे पहा – अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ चिमुरड्यांचा जन्म रस्यावरच झाला

अपार नोंदणी बाकी

अहिल्यानगर महापालिका ४२२६

अहिल्यानगर तालुका ३१८५

कर्जत १५३१

अकोले २४५७

जामखेड २५९१

श्रीरामपूर २६४८

पारनेर २७३१

श्रीगोंदा २८६७

राहुरी ३३९१

राहाता ३५२५

शेवगाव ३७०१

कोपरगाव ४०३८

पाथर्डी ४०८८

नेवासा ५५९४

संगमनेर ६४०३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here