Rahata : राहाता तालुक्यात ‘महाराजस्व समाधान शिबिरांचे’ आयोजन; बाभळेश्वर येथे पहिले शिबिर

Rahata : राहाता तालुक्यात 'महाराजस्व समाधान शिबिरांचे' आयोजन; बाभळेश्वर येथे पहिले शिबिर

0
Rahata : राहाता तालुक्यात 'महाराजस्व समाधान शिबिरांचे' आयोजन; बाभळेश्वर येथे पहिले शिबिर
Rahata : राहाता तालुक्यात 'महाराजस्व समाधान शिबिरांचे' आयोजन; बाभळेश्वर येथे पहिले शिबिर

Rahata : नगर : महसूल व अन्य शासकीय विभागांच्या विविध सेवा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व महिलांपर्यंत एकाच ठिकाणी पोहोचवण्यासाठी राहाता (Rahata) तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)’ राबवण्यात येत आहे. याअंतर्गत पहिले एकदिवसीय शिबिर (Camp) शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता बाभळेश्वर येथे होणार असून, नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार (Tahsildar) अमोल मोरे यांनी केले आहे.

हेही वाचा : श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरां’चे आयोजन

एकाच छताखाली विविध सेवा

​या मंडळस्तरीय शिबिरांमध्ये प्रामुख्याने दाखले वाटप, सातबारा (७/१२) अद्ययावतीकरण, अभिलेख दुरुस्ती, ॲग्रीस्टॅक आणि ई-मोजणी यांसारख्या सेवा दिल्या जातील. यासोबतच आयुष्मान भारत कार्ड व ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसह इतर प्रलंबित ‘ई-केवायसी’ पूर्ण करण्याची सुविधाही एकाच छताखाली उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नक्की पहा : कोपरगावात युवकाचा दगडाने ठेचून खून

येथे होणार शिबिरे (Rahata)

​बाभळेश्वरमधील पहिल्या शिबिरानंतर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी दि.​१४ मार्च रोजी अस्तगाव, ​दि.१० एप्रिल – लोणी, दि.​१७ एप्रिल- पुणतांबा, दि.​८ मे – राहाता, दि.​१५ मे – शिर्डी येथे शिबिर पार‌ पडणार आहेत. या समाधान शिबिरांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका प्रशासनाच्या वतीने १८ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान सर्व मंडळस्तरांवर विशेष पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे.