Traffic Branch Action : वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई

Traffic Branch Action : वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई

0
Traffic Branch Action : वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई
Traffic Branch Action : वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेची कारवाई

Traffic Branch Action : नगर : अहिल्यानगर शहरातील चांदणी चौकात वाहतूक नियम भंग करणाऱ्या (Traffic Violation) वाहनांवर शहर वाहतूक शाखेच्या पथकाने (Traffic Branch Action) ७० वाहनांवर कारवाई केली आहे. लायसन सोबत न बाळगणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे (Driving Triple Seat Vehicle), वाहनास नंबर प्लेट नसणे, फॅन्सी नंबर प्लेट बसविणे, तसेच वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे याबाबत कारवाई करण्यात आली आहे.

नक्की पहा : कोपरगावात युवकाचा दगडाने ठेचून खून

सुमारे एक लाख ५० हजार ६५० रुपयांचा दंड

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली या कारवाईत सुमारे एक लाख ५० हजार ६५० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D

मोटार वाहन कायद्या प्रमाणे कारवाई (Traffic Branch Action)

शहर वाहतूक शाखेच्या वतीने अहिल्यानगर शहरातील चांदणी चौक येथे आचानक नाकाबंदी करुन वाहतुक नियमभंग करणारे वाहनचालकांविरुध्द मोटार वाहन कायद्या प्रमाणे वाहनास काळी काच बसविलेल्या ३, लायसन्स सोबत न बाळगणे २०, लायसन्स नसणे ७, ट्रिपल शिट वहन चालवणे १९, वाहनास नंबर प्लेट नसणे / फॅन्सी नंबर प्लेट बसवणे ५९, वाहन चालविताना मोबाईल फोनवर बोलने १, अवैध प्रवाशी वाहतुक केसेस २ इतर ७० अशा एकुण १८१ वाहनांवर ई चलानद्वारे कारवाई करण्यात आली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, शहर वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, मन्सुर सय्यद, असिफ शेख, रामराव शिरसाट, संजय घोरपडे, खेडकर, सतिश दळवी, मधुकर ससे, गडदे वॉर्डन, अरविंद चौटिले, निखिल कारखेले, संदिप शेंडगे, गैरव पाटोळे यांच्या पथकाणे केली.