Impact Of The War On Maharashtra | महाराष्ट्रातील बाजारपेठेला युद्धाच्या झळा; शेतमाल ते शेअर मार्केट सगळीकडेच शिमगा

0

Impact Of The War On Maharashtra | नगर : अमेरिका- इस्त्रायल यांचे इराण विरोध सुरु असलेल्या युद्धाचे थेट परिणाम आता अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील (Impact Of The War On Maharashtra) शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर दिसून लागला आहे. या युद्धाने शेअर बाजार, कृषी बाजार समित्यांसह सर्व व्यवसायांवर परिणाम दाखवायला सुरुवात केली आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम निर्यातीवर

नाशिकमधून निर्यातीसाठी पाठवण्यात आलेले सुमारे १५० हून अधिक कंटेनर सध्या मुंबईतील नेहरू पोर्ट बाहेर अडकून पडले आहेत. हा कांदा आखाती देशांमध्ये इस्त्रायल, दुबई, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे निर्यात केला जातो. या निर्यातीसाठी कांदा प्रथम मुंबईतील बंदरावर पाठवला जातो आणि तेथून तो पुढे आखाती देशाकडे रवाना केला जातो. दुबईमार्गे या मालाची पुढील वाहतूक होत असल्याने दुबईतील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम निर्यातीवर झाला आहे.

नक्की पहा : कोपरगावात युवकाचा दगडाने ठेचून खून

दुबईकडे जाणारे कंटेनर बाहेरच अडकले

दुबईमधील वाहतूक आणि बंदर सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्याने दुबईकडे जाणारे कंटेनर बाहेरच अडकले आहेत. परिणामी, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा कांदा सध्या अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पर्यायी मार्ग किंवा आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

शेअर बाजारात शिमगा; सेन्सेक्स १,०४८ अंकांनी कोसळला

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे काल, २ मार्च रोजी भारतीय शेअर बाजार घसरला. सेन्सेक्स १०४८ अंकांनी (१.२९%) घसरून ८०,२३९ वर बंद झाला. निफ्टी देखील सुमारे ३१३ अंकांनी (१.२४%) घसरून २४,८६६ वर पोहोचला. भू-राजकीय तणाव आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे कंपनीचा नफा कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकण्यास सुरुवात करतात आणि सोने-चांदीसारख्या सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये गुंतवणूक करतात. यामुळे बाजारात घसरण होते.

सोने पुन्हा महागले

एमसीएक्स फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.६७ रुपयांवर आहे, जो पाच हजार रुपयांनी (३ टक्के) वाढला आहे. चांदीचा भाव आठ हजार रुपयांनी (३ टक्के) वाढून २.९१ लाख रुपयांवर पोहोचला आहे. कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया यांच्या मते, अमेरिका-इराण युद्धामुळे सोने १.९० लाख रुपयांपर्यंत आणि चांदी ३.५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

हे वाचा – पाकिस्तानला आणखी एक धक्का; रद्द होणार बांगलादेश मालिका, कारण काय?

कच्चे तेल ७९ डॉलर प्रती बॅरलवर

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे काल ऊर्जा आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूडच्या किमती १० टक्के वाढून प्रती बॅरल ७९ डॉलरवर पोहोचल्या. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर हा तणाव आणखी वाढला तर तेलाच्या किमती प्रति बॅरल १२० डॉलरवर पोहोचू शकतात. याचा परिणाम भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होऊ शकतो. दिल्लीत पेट्रोल प्रती लीटर ९५ रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत वाढू शकते. डिझेल ८८ रुपयांवरून ९२ रुपयांपर्यंत वाढू शकते. इतर शहरांमध्येही अशाच प्रकारच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here